"रशियन गर्लला बोलवून सतीश कौशिकला ब्लू पिल्स देऊ" : महिलेच्या तक्रारीने खळबळ - Mumbai Tak
Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / “रशियन गर्लला बोलवून सतीश कौशिकला ब्लू पिल्स देऊ” : महिलेच्या तक्रारीने खळबळ
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

“रशियन गर्लला बोलवून सतीश कौशिकला ब्लू पिल्स देऊ” : महिलेच्या तक्रारीने खळबळ

Satish Kaushik Death Case :

अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Actor Satish Kaushik) यांच्या मृत्यूप्रकरणात घातपाताचा संशय बळावला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत एका महिलेने तिचा उद्योगपती पती आणि कुबेर ग्रुपचे प्रमुख विकास मालू याच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिने विकास मालूने सतीश कौशिक यांच्याकडून गुंतवणुकीसाठी १५ कोटी रुपये घेतल्याचा दावा केला आहे. कोरोना काळात पैसे बुडाल्यानंतर सतीश कौशिक यांना मार्गातून हटविण्यासाठी कट रचला, असा आरोप करण्यात आला आहे. (In the case of Satish Kaushik’s death, the second wife of businessman Vikas Malu is raising suspicion of conspiracy)

नेमकं काय आहे प्रकरण?

व्यापारी विकास मालूच्या दुसऱ्या पत्नीने दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पाठवलेल्या तक्रारीत म्हंटलं की, “माझा 13 मार्च 2019 ला विकास मालू यांच्याशी कायदेशीर विवाह झाला होता. विकासनेच माझी ओळख अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्याशी करून दिली. भारतात आणि दुबईत ते आमच्या कुटुंबाचे अत्यंत जवळचे पाहुणे होते. त्यांचं आमच्या घरी नियमित येणं-जाणं होतं.

23 ऑगस्ट 2022 रोजी सतीश कौशिक आमच्या दुबईमधील घरी आले होते. यावेळी त्यांनी विकासकडे त्यांचे 15 कोटी रुपये परत मागितले. त्यावेळी मी ड्रॉईंग रूममध्ये होते. सतीश कौशिक आणि विकास यांच्यात पैशांवरुन वाद झाला. आपल्याला या पैशांची गरज असल्याचं सतीश कौशिक सांगत होते. सतीशजींनी 3 वर्षांपूर्वी विकासला गुंतवणुकीसाठी 15 कोटी रुपये दिले होते. परंतु विकासने ना त्या पैशाची गुंतवणूक केली ना तो पैसे परत केले. तो सतीश यांच्या सोबत एकप्रकारे फसवणूक करत होता.

विकास मालूने यावेळी सतीश कौशिक यांना 15 कोटी रुपये लवकरच भारतात येऊन परत करण्याचं आश्वासन दिलं. त्याच रात्री विकास बेडरूममध्ये आला तेव्हा मी त्याला विचारलं होतं, सतीश कौशिकजी कोणते पैसे मागत होते? तेव्हा विकास म्हणाला, ‘त्यांनी 15 कोटी रुपये दिले होते, पण ते कोरोनामध्ये बुडाले’. मी त्याला विचारले आता काय करणार? तर विकास म्हणाला, “एखाद्या दिवशी रशियन मुलीला फोन करून ब्लू पिल्सचा ओव्हरडोज देईन, मग तो तसाच मरून जाईल. हे पैसे कोण परत करत आहे?”

दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 ऑगस्ट 2022 रोजी सतीश कौशिक यांनी पुन्हा विकासकडे 15 कोटी मागितले. तेव्हा विकास संतापला आणि अरे-तुरे करत म्हणाला, “मी तुला एकदा सांगितलं ना की नुकसान झालं आहे, पण तुला भारतात परत येऊन पैसे परत करतो. जास्त दंगा केला तर तु 15 कोटी रोख दिले आहेत, त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही, जरा धीर धर”,अशी धमकी दिली.

विकासची ही धमकी ऐकून सतीश कौशिक कमालीचे हादरले. पण मला 15 कोटींची प्रॉमिसरी नोट दिली आहेस, असं त्यांनी विकासला सांगितलं. नेमकं त्याच रात्री विकासने मला सांगितलं की, “सतीश कौशिकचा लवकर बंदोबस्त करावा लागेल, अन्यथा तो गप्प बसणार नाही.”

पुढे बोलताना संबंधित महिलेनं आणखी गंभीर आरोप लावले. ती म्हणाली, विकासजवळ अनेक प्रकराचे ड्रग्ज यात मग हेरॉइन, ब्लू पिल्स, पिंक पिल्स, एमडीएमए, जीएसबी अशा गोष्टींचं मोठं कलेक्शन आहे. याचा वापर तो दिल्लीत फार्म हाऊसवरील अनेक पार्ट्यांमध्ये करायचा. जेव्हा मी या सगळ्या ड्रग्जबाबत विचारलं तेव्हा तो मला म्हणायचं, “तुला नाही समजणार”

पत्नीने तक्रारीत पुढे म्हंटलं की, विकास मालूचे अनेक उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांशी आणि सर्वपक्षातील राजकारण्यांशी चांगले संबंध आहेत. स्वतःला वाचविण्यासाठी तो त्यांचा वापर करु शकतो. पण विकास गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला तुरुंगवासही भोगावा लागला आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन सतीश कौशिक यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी निष्पक्ष तपास व्हायला हवा, अशी मागणीही केली आहे.

ठाकरेंना जबर धक्का : सुभाष देसाईंच्या कुटुंबातच फूट; पुत्र एकनाथ शिंदेंसोबत!

दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप :

महिलेने तिच्या आरोपांमध्ये दावा केला की, विकास मालूचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत आणि तो देशविरोधी कारवायांमध्ये सामील आहे. याची खातरजमा करण्यासाठी विकासच्या पत्नीने तक्रार अर्जासोबत एक फोटोही सादर केला आहे. हा फोटो विकास मालूने दुबईत आयोजित केलेल्या पार्टीचा असल्याचा दावा केला आहे.

या फोटोत अभिनेता सतीश कौशिक आणि दाऊद इब्राहिमचा मुलगा अनस ही उपस्थित होता. सतीश कौशिक दुबईत झालेल्या पार्टीत सहभागी होण्यासाठी गेले होते. विशेष म्हणजे संबंधित महिलेनेही पती विकास मालूवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

जाणून घ्या कोण आहे विकास मालू?

विकास मालू कुबेर ग्रुपचा मालक आहे. त्याचे वडील मूलचंद मालू यांनी 1985 मध्ये कुबेर खैनी यांच्यासोबत हा ग्रुप सुरू केला. 1993 मध्ये विकास मालू ग्रुपचे संचालक झाले. कुबेर ग्रुपचा व्यवसाय 50 देशांमध्ये पसरलेला आहे. कुबेर ग्रुप सर्व प्रकारचे पान मसाले, माउथ फ्रेशनर, सुगंध (धूप आणि अगरबत्ती), खाण्यायोग्य आणि अखाद्य तेले इत्यादींच्या उत्पादनाच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. विकास मालू व्यवसायाव्यतिरिक्त बॉलिवूड स्टार्समध्ये खूप लोकप्रिय आहे.

Viral Video मुळे चर्चेत आलेल्या शीतल म्हात्रे कोण आहेत?

सतीश विकासच्या पार्टीला आला होता :

होळीदिवशी अभिनेता सतीश कौशिकने विकास मालूच्या दिल्लीतील फार्म हाऊसवरील पार्टीत मुंबईहून हजेरी लावली होती. रिपोर्टनुसार, सतीश कौशिक गुरुग्राममध्ये विकास मालूच्याच घरी थांबला होता. पार्टीच्या रात्री, कौशीक यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे.

आरोपांनी बदलली तपासाची दिशा :

दरम्यान, सतीश कौशिकच्या मृत्यूनंतर विकास मालूच्या पत्नीने पोलिसांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाला नवीन वळण दिलं आहे. सतीश कौशिक यांना चुकीचे औषध पाजल्यासारखे गंभीर आरोप महिलेने पती विकासवर केले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विकास मालूच्या पत्नीलाही चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे.

या आरोपांवर विकास मालू यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, “सतीशजी 30 वर्षांपासून माझ्या कुटुंबाचा एक भाग होते आणि माझे नाव जगासमोर चुकीचे सांगण्यास एक मिनिटही लागला नाही. मला सांगायचे आहे की संकट कधीच सांगून येत नाही आणि त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. अजूनही या धक्क्यातून सावरलेलो नाही.”

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!