Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / तब्बल 13 महिलांवर बलात्कार करणारा वासनांध तुरुंगातून सुटला!
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

तब्बल 13 महिलांवर बलात्कार करणारा वासनांध तुरुंगातून सुटला!

A lust-obsessed accused will be released from prison: मँचेस्टर: तब्बल 13 महिलांवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या एका व्यक्तीची तुरुंगातून (prison) सुटका करण्यात आली आहे. अँड्र्यू बार्लो असे या वासनांध गुन्हेगाराचे (lust-obsessed accused) नाव आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला बार्लो हा 1988 साली पोलिसांच्या जाळ्यात अखेर सापडला होता. हे प्रकरण ब्रिटनमधील ग्रेटर मँचेस्टरचे आहे. डिसेंबरमध्ये त्याच्या सुटकेची घोषणा करण्यात आली होती. त्याला उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांनीही विरोध केला होता. 66 वर्षीय बार्लोने एकूण 13 महिलांवर बलात्कार केला होता. तसेच त्याच्याविरोधात इतरही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. (lustful accused who raped as many as 13 women was released from prison)

अँड्र्यू बार्लोला 13 जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने तब्बल 34 वर्षे तुरुंगात काढली आहेत. आता त्याला तुरुंगातून एका वसतिगृहात नेण्यात आले आहे. पूर्वी तो अँड्र्यू लाँगमायर या नावाने ओळखला जात असे. मग त्याने आपले नाव बदलून अँड्र्यू बार्लो ठेवले होते.

तुरुंगातून का करण्यात आली सुटका?

बार्लोने बराच काळ तुरुंगात घालवल्यामुळे आता त्याला सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याने 34 वर्षांची शिक्षा पूर्ण केली आहे, त्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका होईल, असे पॅरोल बोर्डाने सांगितले होते. मात्र तो पोलिसांच्या निरीक्षणाखाली असेल. तसेच तो ग्रेटर मँचेस्टरला (Greater Manchester) जाऊ शकत नाही. त्याला ठरवून दिलेल्या ठिकाणीच तो राहू शकतो. तसेच त्याने काही नवे संबंध प्रस्थापित केले तर त्याबाबत त्याला माहिती देणं बंधनकारक असणार आहे. तसेच, त्याला नियमितपणे ड्रग टेस्ट देखील पास करावी लागेल. याशिवाय त्याच्यावर जीपीएसद्वारे देखील नजर ठेवण्यात येणार आहे.

पुण्यात 21 वर्षीय महिलेवर एकाच दिवशी दोनदा बलात्कार; आरोपी अटकेत

पीडित महिलांच्या काळजाचा ठोका चुकला

वासनांध आरोपी बार्लो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एका पीडितेने याबाबत बोलताना सांगितले की, ‘मला भीती वाटते की तो पुन्हा आपले नाव बदलेल. मला हे देखील माहिती आहे की, त्याच्या अत्याचारांना बळी पडलेल्या अनेक महिल्या या भीतीपोटी पुढे न आलेल्या नाहीत. त्याने 34 वर्षे तुरुंगात काढली, पण तो अजूनही तसाच दुष्ट माणूस आहे. मला वाटते की तो अजूनही धोकादायक आहे.

मैत्रिणीला घरी बोलावलं, शीतपेयातून बियर पाजत केला बलात्कार; आरोपी अटकेत

अर्थात, तो 66 वर्षांचा आहे, परंतु आता तो 34 वर्षांच्या तुरुंगवास भोगल्याचा ठपका माथ्यावर घेऊन फिरणार आहे. बार्लोला 1988 मध्ये 11 महिलांच्या बलात्कारासाठी 11 जन्मठेपेची आणि इतर गुन्ह्यांसाठी अतिरिक्त 56 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पुढे त्याला आणखी काही प्रकरणांमध्ये शिक्षा झाली होती. 2010 आणि पुन्हा 2017 मध्ये त्याला आणखी दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा 1981 आणि 1982 च्या गुन्ह्यांसाठी देण्यात आली होती. मात्र, आता 34 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर त्याची सुटका करण्यात येत आहे.

ब्रिटनमधील न्याय मंत्रालयाच्या प्रवक्त्याने याप्रकरणी बोलताना असं म्हटलं की, ‘आम्हाला माहित आहे की पीडितांसाठी हा कठीण काळ असेल, परंतु अँड्र्यू बार्लो आयुष्यभर देखरेखीखाली असेल आणि जर त्याने त्याच्या सुटकेच्या कठोर अटींचे उल्लंघन केले तर त्याला पुन्हा तुरुंगात टाकले जाऊ शकते.’

पालघरमध्ये खळबळ! 16 वर्षाच्या मुलीवर 8 नराधमांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार? bageshwar dham sarkar: बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींविरुद्ध दुसरा गुन्हा