अतिक अहमदची ‘अफाट’ संपत्ती… आता कोण असणार वारसदार?

ADVERTISEMENT

What is the net worth of Mafia, Baahubali leader Atiq Ahmed
What is the net worth of Mafia, Baahubali leader Atiq Ahmed
social share
google news

What is the net worth of Atiq Ahmed : एकेकाळी प्रयागराजमधील दहशतीला कारणीभूत असलेल्या अतिक अहमदचा आता अंत झाला आहे. मेडिकलसाठी आणलं जात असताना 3 हल्लेखोरांनी त्याला आणि भाऊ अशरफला गोळ्या घातल्या. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या आठवडाभरात माफिया अतिकसह कुटुंबातील तीन जणांची हत्या झाली आहे. अतिकच्या मृत्यूपूर्वी अतिकचा मुलगा असदला एसटीएफने चकमकीत मारला. बाकीचे एक तर तुरुंगात आहेत, किंवा फरार आहेत. (What is the net worth of Mafia, Baahubali leader Atiq Ahmed)

अतिक अहमदच्या कुटुंबात अतिक अहमद आणि त्याची पत्नी शाइस्ता परवीन आणि त्यांना पाच मुले आहेत. मोठा मुलगा उमर लखनौ तुरुंगात आहे. दुसरा मुलगा अली हा प्रयागराजच्या नैनी तुरुंगात बंद आहे. तिसरा मुलगा असद हा एसटीएफने 13 एप्रिलला चकमकीत मारला. अतिकची उर्वरित दोन मुले अद्याप अल्पवयीन असून, ते बालगृहात आहेत. एकूणचं अतिकमुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहात झाली आहे.

पण एकेकाळी दहशत असणारा अतिक अहमद कोण? त्याचा इतिहास काय होता, जाणून घेऊया..

अतिक अहमदचा जन्म 10 ऑगस्ट 1962 रोजी झाला आणि 15 एप्रिल 2023 रोजी त्याची हत्या झाली. म्हणजेच वयाच्या 60 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. अतिक अहमदचे कुटुंब एकेकाळी खूप गरीब होते. वर्ष होतं 1979. त्यावेळी अलाहाबादच्या चकिया परिसरात फिरोज अहमद नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो टांगा चालवून कुटुंबाचा खर्च भागवत असे. या फिरोजचा मुलगा गुंडगिरीत जास्त आणि अभ्यासात कमी होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अतिक-अशरफला डोक्यात गोळ्या घातल्यानंतर का पळाले नाही हल्लेखोर?, सांगितलं ‘हे’ कारण

दहावीचा निकाल आला आणि फिरोजचा मुलगा नापास झाला. आता तो या परीक्षेत नापास झाला पण लवकरच श्रीमंत आणि बाहुबली बनण्याचे स्वप्न पाहू लागला. जरी तो 17 वर्षांचा होता. म्हणजे तो अजून प्रौढही झाला नव्हता. मतदान करता आले नसले तरी जीव घेण्याचे त्याने ठरवले होते. वर्ष उलटून गेले आणि इथे या अल्पवयीन ते प्रौढ मुलाचा गुन्हेगारीचा आलेखही वाढतच गेला. तो आता अतिक अहमद या नावाने कुप्रसिद्ध झाला होता.

किती आहे अतिक अहमदची संपत्ती? :

ज्या संपत्ती आणि प्रसिद्धीसाठी अतिकने गुन्ह्याचा मार्ग निवडला, त्या संपत्तीकडे बघण्यासाठी आज कोणीही नाही. अतिक अहमदने 3 दशकात भरपूर संपत्ती कमावली. यात बेनामी संपत्तीचाही समावेश होतो. आज आम्ही तुम्हाला आतिक अहमदची किती जाहीर आणि किती बेनामी संपत्ती होती ते सांगणार आहोत. कारण त्याने बहुतांश मालमत्ता हडप करून स्वतःच्या नावावर केली होती. आता त्याची अफाट संपत्ती कोणाला मिळणार, हा मोठा प्रश्न आहे.

ADVERTISEMENT

निवडणूक प्रतिज्ञापत्रात एवढीच मालमत्ता :

अतिक अहमदने किती मालमत्ता जाहीर केली होती हे आधी बघू. अतिक अहमदने 2019 मध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावळी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याने एकूण 25 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. अतिक अहमदची डझनाहून अधिक बँक खाती असल्याचे प्रतिज्ञापत्रातून उघड झाले. कागदी संपत्ती बाजूला ठेवून अतिक अहमदने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे संपत्ती कमावली होती.

ADVERTISEMENT

आता अतिक अहमदच्या बायकोसाठी ‘हा’ खास प्लॅन, यावेळी वाचणं कठीण?

मात्र, गेल्या 2 वर्षात अतिक अहमदची बहुतांश बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे किंवा त्यावर बुलडोझरचा फिरवण्यात आला आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अतिक अहमदची सुमारे 1 हजार 169 कोटी रुपयांची मालमत्तेवर एकतर बुलडोझर फिरवण्यात आला किंवा जप्त करण्यात आली आहे. यातील 417 कोटींची मालमत्ता प्रशासनाने ताब्यात घेतली असून, सुमारे 752 कोटींच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.

तीन दशकांपासून दहशत :

अतिकने गेल्या 3 दशकांमध्ये सुमारे 1 हजार 200 कोटी रुपयांच्या अवैध संपत्तीचे साम्राज्य उभे केले होते. तरीही अतिकच्या बेकायदेशीर मालमत्तेबाबत माहिती गोळा केली जात आहे. अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम यांच्या एन्काउंटरपूर्वी ईडीने अतिक आणि त्याच्या जवळच्या लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर ईडीला 15 ठिकाणांहून 100 हून अधिक बेकायदेशीर आणि बेनामी मालमत्तांची कागदपत्रे मिळाली होती.

यादरम्यान त्याने लखनऊ आणि प्रयागराजमधील पॉश भागात अनेक मालमत्ता खरेदी केल्याचेही समोर आले आहे. या मालमत्ता आतिकच्या नावावर आहेत किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहेत. ईडीला लखनऊमध्ये 5900 चौरस मीटरमध्ये 47 लाख रुपये किमतीचे अतिकच्या नावावर नोंदणीकृत घर असल्याचा पुरावाही सापडला आहे. 2013 मध्ये अतिक अहमद याने लखनौमधील गोमतीनगरचा भूखंड केवळ 29 लाख रुपयांचा असल्याचं सांगितलं होतं. पण सर्कल रेटच्या आधारे त्याची किंमत 47 लाख रुपये होती.

अतिकच्या संपत्तीचा कोण आहे दावेदार?

अतिकच्या मृत्यूनंतरचा सर्वात मोठा प्रश्न उभा राहत आहे तो म्हणजे त्याची पत्नी शाइस्ता परवीन आणि त्याच्या मुलांना संपूर्ण मालमत्तेबद्दल माहिती आहे का? वृत्तानुसार, अतिक आणि अशरफ तुरुंगात गेल्यानंतर शाइस्ता परवीनने जमिनीशी संबंधित अवैध धंदे हाती घेतले. उमेश पालच्या हत्येमागे शाइस्ताचीही मोठी भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. उमेश पालच्या हत्येप्रकरणी तिचं नाव समोर आल्यापासून ती फरार आहे.

कधी सिंह म्हणवून घेणाऱ्या अतिक अहमदचा झाला अंत: काय आहे त्याचा इतिहास?

इतकेच नाही तर हत्या करण्यापूर्वी अतिकने पोलिसांना 14 लोकांची नावे सांगितली होती जे त्याला आर्थिक मदत करत होते. ही रक्कम शाइस्ता परवीनला पाठवली जात होती. त्यामुळे पोलिसांनी शाईस्ताचा वायूवेगाना शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक अहमदने पोलिसांच्या चौकशीत अशा 200 हून अधिक बनावट कंपन्यांची माहिती दिली आहे, ज्यांच्याशी त्याच्या अवैध मालमत्तेचा संबंध आहे. शाइस्ता परवीन शेवटी प्रयागराजचे घर पाडले जात असताना दिसून आली होती. त्यानंतर अतिकच्या बहिणीसोबत पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या शाइस्ताने अतिकच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT