Mumbai Crime : रिटायर्ड DCP ने मागितला २५ लाखांचा हुंडा; मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या मुलीची आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : येथील २६ वर्षीय तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी निवृत्त पोलीस अधिकारी बापू कटकधोंड यांचा मुलगा आतिश कटकधोंडला अटक करण्यात आली आहे. आतिशसोबत लग्न करण्यासाठी २५ लाखांचा हुंडा मागितल्याचा आरोप कटकधोंड कुटुंबावर करण्यात येत आहे. या प्रकरणी बापू कटकधोंड आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरु आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, रिलायन्स कंपनीमध्ये एच.आर. विभागात काम करणाऱ्या सोनाली सदाफुले (२६ वर्ष) या तरुणीने १४ डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी सोनालीने सुसाईड नोटही लिहिली होती. यात तिने आतिश कटकधोंड, आतिशचे वडील बापू कटकधोंड, आई स्मिता कटकधोंड आणि बहीण श्रुती कटकधोंड यांना आत्महत्येस जबाबदार धरलं आहे.

आत्महत्येनंतर सोनालीच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. सोनाली आणि आतिश यांच्या लग्नासाठी कटकधोंड कुटुंबीयांनी तब्बल २५ लाख हुंड्याची मागणी केली होती, ही मागणी पूर्ण करु शकत नसल्याने आतिशचं लग्न दुसरीकडं ठरविण्यात आले. १४ डिसेंबरलाच आतिशचं हे लग्न पार पडलं. त्याचदिवशी हे सहन न झाल्यानं सोनालीने आत्महत्या केली असा दावा सदाफुले कुटुंबीयांनी केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मृत सोनाली ही रिलायन्स सारख्या मल्टिनॅशनल कंपनीच्या एचआर विभागात काम करत होती. मागील अनेक वर्षांपासून सोनाली आणि आतिशमध्ये प्रेमसंबंध होते. मिळालेल्या माहितीनुसार, आतिश आणि सोनाली यांच्यात नियमीत भांडण होतं असतं. आतिश सोनालीकडून पैसेही घेत होता. सोनालीही तिचा १ लाख रुपयांचा पगार आतिशला द्यायची. पण जेव्हा लग्नाचा विषय सुरु झाला तेव्हा कटकधोंड कुटुंबियांनी २५ लाख रुपये हुंड्याची मागणी केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT