'पीएफआय' सदस्यांचा व्हॉट्सअप ग्रुप म्होरक्या पाकिस्तानचा? तपासात मोठे कनेक्शन हाती - Mumbai Tak
Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / ‘पीएफआय’ सदस्यांचा व्हॉट्सअप ग्रुप म्होरक्या पाकिस्तानचा? तपासात मोठे कनेक्शन हाती
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

‘पीएफआय’ सदस्यांचा व्हॉट्सअप ग्रुप म्होरक्या पाकिस्तानचा? तपासात मोठे कनेक्शन हाती

नाशिक : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या पाच संशयित सदस्यांचे तपासादरम्यान पाकिस्तान कनेक्शन हाती आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. पोलीस तपासात या संबंधित काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयाने 5 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मात्र जोडीला चार दिवसांची पोलीस कोठडीही राखीव ठेवण्यात आली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली आहे. तपासावेळी संशयितांची एकत्रित चौकशी करण्यासाठी पुढे गरजेनुसार चार दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे.

मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (26, मालेगाव), अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (48), रझी अहमद खान (31, दोघे रा. कोंढवा, पुणे), वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख (29, रा. बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. कोल्हापूर) अशी या पाच संशयितांची नाव आहेत. नाशिक दहशतवाद विरोधी पथकाने 22 सप्टेंबरला यांना अटक केली होती. न्यायालयाने सुरुवातीस 12 आणि नंतर 5 दिवसांची कोठडी सुनावली होती.

तपासादरम्यान या संशयितांकडून संगणक, हार्डडिस्क, मोबाईल जप्त करण्यात आले होते. यात संशयितांचा व्हॉट्सअप ग्रुप आढळून आला असून त्याचा अ‍ॅडमिन पाकिस्तानातील असल्याचे उघड झाले. या ग्रुपमध्ये भारतासह, पाकिस्तान, यूएई, अफगाणिस्तान देशांमधीलही सदस्य सहभागी आहेत. ग्रुपमध्ये 175 ते 177 सदस्य होते. यातील काही संशयित परदेशात जाऊन आले असल्याचंही समोर आले. तसेच बँकेचे व्यवहारही तपासण्यात आले.

तपासात या गोष्टी समोर आल्यात.

  • येत्या 2047 पर्यंत भारत मुस्लीम राष्ट्र करणे, राममंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद उभारणे.

  • सिमी या दहशतवादी संघटनेच्या कामकाजानुसार पीएफआयच्या कामाची पद्धत.

  • संशयितांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले असून, काहींनी परदेशातही वास्तव्य केल्याचे उघड.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!