Shraddha Murder: नॉनव्हेज खाण्यासाठी श्रद्धाला भाग पाडत होता आफताब, जीव वाचावा म्हणून..."

श्रद्धाची मैत्रीण पूनमने केले धक्कादायक खुलासे
Shraddha Murder: Aftab was forcing Shraddha to eat non-veg told her Friend Poonam
Shraddha Murder: Aftab was forcing Shraddha to eat non-veg told her Friend Poonam

श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे अवघा देश हादरला आहे. या प्रकरणात आता रोज नवनवे खुलासे होत आहेत. श्रद्धाची मैत्रीण पूनमने काही गोष्टी सांगितल्या आहेत. आफताब श्रद्धाला मारहाण करत होता आणि तिला नॉनव्हेज खाण्यासाठी भाग पाडत होता असं पूनमने सांगितलं आहे.

काय सांगितलं आहे श्रद्धाची मैत्रीण पूनमने?

पूनमच्या सांगण्यानुसार श्रद्धाने तिच्याकडे तीनवेळा मदत मागितली होती. पूनम बिडलान ही नालासोपारा या ठिकाणी राहते. वसईतल्या एव्हर शाईन सिटीमध्ये श्रद्धा आणि आफताब पूनावाला दोघं राहण्यासाठी आले होते. त्या दरम्यान श्रद्धाने पूनमकडे तीनदा मदत मागितली होती. एकदा तर पूनम श्रद्धाला घेऊन तुळिंज पोलीस ठाण्यातही गेली होती. तिने तिथे आफताबच्या विरोधात NC दाखल केली होती. या प्रकरणाचं गांभीर्य पाहून श्रद्धा FIR दाखल करण्याच्या तयारीत होती असंही पूनमने सांगितलं.

पूनमने आफताबबाबत काय सांगितलं?

आफताब श्रद्धाला मारहाण करत होता. तो मारहाण करायचा त्यादिवशी घरी येत नव्हता. त्यावेळी तो त्याच्या आई वडिलांकडे जायचा. त्यानंतर त्याचे आई वडील आफताबच्या वतीने श्रद्धाची समजूत घालायचे. मग ती त्याला माफ करायची. असं दोन-तीनवेळा झाल्याचं पूनमने सांगितलं.

श्रद्धाने पूनमला सांगितलं होतं की आफताब माझा जीव घेऊ शकतो

श्रद्धाने एकदा पूनमला सांगितलं होतं की आफताब माझा जीव घेऊ शकतो. एवढंच नाही तर श्रद्धाने बॉय कट केला होता तेव्हा तिच्या डोक्यावर आणि गालावर काळ्या खुणा होत्या. गळ्यावर अशा खुणा दिसत होत्या जसा काही तिचा गळा कुणीतरी दाबला आहे असंही श्रद्धाबाबत पूनमने सांगितलं. श्रद्धाला मी जेव्हा याबाबत विचारलं तेव्हा तिने मला सांगितलं की मला आफताबने जबर मारहाण केली आहे. माझा गळा त्याने इतका जोरात दाबला की माझा जीव गेला असता मी कशीबशी जीव वाचवून पळाले असंही तिने आपल्याला सांगितल्याचं पूनमने सांगितलं. त्यावेळी आफताबने श्रद्धाला मारलं होतं कारण तिने नॉनव्हेज खायला नाही म्हटलं होत. श्रद्धाला नॉनव्हेज खाण्यासाठी आफताब भाग पाडत होता असंही पूनमने सांगितलं आहे.

आफताबने जबरदस्तीने श्रद्धाला मांस खायला लावलं होतं

आफताबने जबरदस्तीने श्रद्धाला नॉनव्हेज खायला भाग पाडलं होतं. पूनमने श्रद्धाची समजूत घातली होती. आफताब दुसऱ्या धर्माचा आहे. तो जर तुला इतकी मारहाण करतो तर तू त्याच्यासोबत का राहतेस? मात्र पूनमचं तिने ऐकलं नाही. श्रद्धाला नॉनव्हेज न खाण्यावरून जेव्हा मारहाण झाली तेव्हा ती खूप घाबरली होती. त्यावेळी श्रद्धाने हेदेखील सांगितलं की आता आफताब घरी येणार नाही तो त्याच्या आई वडिलांकडे जाईल. श्रद्धाने जर वेळीच त्याची साथ सोडली असती तर ती आज जिवंत असती असंही पूनम सांगते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in