…त्यानंतर आफताबने श्रद्धाला संपवलं, पोलिसांना मिळाली ‘ऑडिओ’ क्लिप

मुंबई तक

Shraddha Walkar And aftab Poonawala : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा (Shraddha Walkar Murder case) तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या (Delhi police) हाती एक महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. पोलिसांना आरोपी आफताब पूनावालाचा (Aftab Poonawala) एक ऑडिओ क्लिप मिळाली आहे. यातून श्रद्धाची हत्या करण्यापूर्वी दोघांमध्ये नक्की काय घडलं होतं, याचीही माहिती समोर आलीये. मूळची मुंबई जवळच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Shraddha Walkar And aftab Poonawala : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा (Shraddha Walkar Murder case) तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या (Delhi police) हाती एक महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. पोलिसांना आरोपी आफताब पूनावालाचा (Aftab Poonawala) एक ऑडिओ क्लिप मिळाली आहे. यातून श्रद्धाची हत्या करण्यापूर्वी दोघांमध्ये नक्की काय घडलं होतं, याचीही माहिती समोर आलीये.

मूळची मुंबई जवळच्या वसईतील असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्याच लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली. श्रद्धा वालकरच्या हत्येनं देशभरात खळबळ उडाली होती. आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले होते.

श्रद्धा वालकरची हत्या केल्याप्रकरणी आफताब पूनावाला सध्या तुरुंगात असून, दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आफताब पूनावालाविरुद्ध पुरावे गोळावे करण्याचं काम दिल्ली पोलिसांकडून सुरू असून, एक महत्त्वाचा पुरावा दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे.

दिल्ली पोलिसांना श्रद्धा वालकरची हत्या होण्यापूर्वीची ऑडिओ क्लिप मिळाली आहे. ही ऑडिओ क्लिप श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला यांच्यातील संवादाची असल्याचं सुत्रांनी सांगितलं. पोलीस महत्त्वाचा पुरावा म्हणून या क्लिपकडे बघत आहेत, कारण यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp