शाळेतून घरी परतत असताना अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार! रस्त्याच्या कडेला पीडिता बेशुद्ध अवस्थेत अन्...

मुंबई तक

शाळेतून घरी परतत असताना एका अल्पवयीन तरुणीवर तीन नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

रस्त्याच्या कडेला पीडिता बेशुद्ध अवस्थेत अन्...
रस्त्याच्या कडेला पीडिता बेशुद्ध अवस्थेत अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शाळेतून घरी परतत असताना शाळकरी तरुणीवर सामूहिक बलात्कार

point

रस्त्याच्या कडेला पीडिता बेशुद्ध अवस्थेत अन्...

Crime News: शाळेतून घरी परतत असताना एका अल्पवयीन तरुणीवर तीन नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रकरणातील पीडिता 7 वीत शिकत असून सोमवारी (3 ऑक्टोबर) ती शाळेतून घरी परतत असताना तिच्यासोबत ही भयानक घटना घडली. घटनेनंतर आरोपींनी अल्पवयीन पीडितेला चहाच्या मळ्यात आक्षेपार्ह अवस्थेत फेकून दिलं. सध्या, मुलीची प्रकृती गंभीर असून पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती आहे. 

चहाच्या मळ्यात तिघांनी केला बलात्कार...

पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे 2:30 वाजता पीडिता शाळा सुटल्यानंतर तिच्या घरी जात असताना ही घटना घडली. वाटेतच, तीन अज्ञात तरुणांनी पीडितेचं अपहरण केलं आणि नंतर चहाच्या मळ्यात जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, आरोपी तिला रस्त्याच्या कडेला फेकून तिथून फरार झाले. या घटनेने मुलीचे कुटुंब आणि गावकरी हादरून गेले आहेत. 

हे ही वाचा: पोटच्या मुलीवर बलात्कार करण्यासाठी आईनेच तिच्या प्रियकराला केली मदत, 'इतक्या' वर्षांचा तुरुंगवास अन् लाखो रुपयांचा दंड...

रस्त्याच्या कडेला पीडिता बेशुद्ध अवस्थेत 

याबाबत कुटुंबियांनी माहिती दिली की, शाळा सुटल्यानंतर मुलगी वेळेत घरी परतली नसल्याने घरच्यांना चिंता वाटू लागली. त्यानंतर, संध्याकाळी जवळपास 5 वाजताच्या सुमारास, एका रिक्षा चालकाने पीडित मुलगी गंभीर अवस्थेत चहाच्या मळ्याजवळीस रस्त्याच्या कडेला आढळल्याची माहिती दिली. माहिती मिळताच, कुटुंबीय लगेच घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी पीडिता बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या शरीरावर जखमा असून तिचे कपडे सुद्धा फाटलेले होते. हे दृश्य पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली. 

हे ही वाचा: सासूच्या निधनाची बातमी समजताच सूनेचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने सर्वत्र हळहळ

संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पीडितेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे. सध्या, पोलिसांना मेडिकल रिपोर्ट्सची प्रतिक्षा आहे. घटनेतील आरोपींचा शोध घेतला असून संभाव्य ठिकाणी छापेमारी केली जात आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp