आईचा राग मनात धरला अन् 14 वर्षांच्या मुलाने मृत्यूला कवटाळलं…
आई रागावली म्हणून पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरातील एका 14 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.विशाल जनार्दन चौधरी असं टोकाचं पाऊल उचललेल्या या मुलाचं नाव आहे.
ADVERTISEMENT
Crime News :
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवडमध्ये मागील आठवड्यातील इंजिनीअरच्या आत्महत्येची बातमी ताजी असतानाच आता आणखी एक आत्महत्या घडली आहे. आई रागावली म्हणून पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरातील एका 14 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.विशाल जनार्दन चौधरी असं टोकाचं पाऊल उचललेल्या या मुलाचं नाव आहे. या आत्महत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. (A shocking suicide of a 14-year-old boy in Akurdi area of Pimpri-Chinchwad)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशालचे वडील कामानिमित्त दुबईत स्थायिक असतात. तर त्यांचे चौधरी कुटुंब आकुर्डीत राहायला असून त्यांचे स्वतः चे घर आहे. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास विशालचे आणि लहान बहिणीचं नेहमी प्रमाणे भांडण झालं. यावर आईने दोघांनाही रागावून चापट मारली अन् जेवायला चला असं प्रेमाने म्हटली. मात्र, विशालला हा राग अनावर झाला.
हे वाचलं का?
Video:स्कूल बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक, विद्यार्थ्यांने स्टेअरींग घेतलं हाती…
तो तसाच टेरेसवर गेला आणि रागाच्या भरात त्याने गळफास घेतला. विशाल का आला नाही म्हणून आईने लहान मुलीला त्याला शोधण्यास सांगितलं. आजूबाजूला पाहिले मग टेरेसवर जाऊन पाहिले असता विशाल लटकत असल्याचं दिसलं आणि तशीच ही बाब लहान मुलीने आईला सांगितली. आई धावत पळत आली, लटकलेल्या मुलाला पाहून तिने हंबरडा फोडला.
आईच्या पायाखालची जमीन सरकली होती. अखेर, दिराच्या मदतीने तातडीने विशालला खासगी रुग्णालयात दाखल केलं. परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे चौधरी कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबाबत पोलीस स्थानकात नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
पंजाब पोलिसांची झोप उडवणारा अमृतपाल सिंग कोण? प्रकरण गंभीर!
चांगल्या पगाराची नोकरी पण…तरुणाने केली आत्महत्या
गत शनिवारीच चांगल्या पगाराची नोकरी आणि सर्व सुखसुविधा असताना माझं मन त्यात लागत नाही म्हणून उच्चशिक्षित तरुणाने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. विरेन जाधव (२७) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव होतं. पिंपरी- चिंचवड शहरातील चिखली येथे असलेल्या रिव्हर रेसिडेन्सीमध्ये तो राहण्यास होता. नोकरी चांगली आहे मात्र माझं मन त्यात लागत नाही.असा उल्लेख त्याने त्यांच्या डायरीत केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT