Murder Case: अल्पवयीन मुलीबरोबर जबरदस्तीनं लग्न, नंतर बलात्कार अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

After marrying minor girl and killing her girl parents blackened her husband face
After marrying minor girl and killing her girl parents blackened her husband face
social share
google news

Kalyan Crime : एका अल्पवयीन मुलीचा (minor girl) मृतदेह घरात गळफास (hanging) घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलीच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, ही मुलगी गेल्या 3 महिन्यापासून बेपत्ता (missing) होती. त्याचबरोबर तिचे जबरदस्तीने लग्न (Forced marriage) लावून देण्यात आले होते. त्यानंतर तिला सातत्याने ब्लॅकमेल (Blackmail) करुन त्रास देण्यात आला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. (After marrying minor girl and killing her girl parents blackened her husband face)

ADVERTISEMENT

तोंडाला काळे फासले

मृत मुलीचा रुक्मिणीबाई रुग्णालयात मुलीचा मृतदेह आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी लग्न झालेला मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांना चोप देत मुलाच्या तोंडाला काळे फासले. या प्रकरणाचा तपास आता टिटवाळा पोलीस करीत असून या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुलगी अचानक बेपत्ता

पुण्यातील निगडी परिसरात राहणारे राजेंद्र रणदिवे यांची अल्पवयीन मुलगी अडीच महिन्यापूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. त्यावेळेपासू कल्याण पश्चिम भागातील गाळेगाव परिसरात राहणाऱ्या रोहन सोबत राहत होती. त्याच रोहनच्या नातेवाईकांनी तिचे लग्न लावून दिले होते असा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा>>  Crime: कपटी वहिनीचे अनैतिक संबंध… नवऱ्याला सांगून नणंदेची क्रूर हत्या!

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीला मुलीला पळवून आणण्यात आले होते, तर दुसरीकडे तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले होते. मुलीचे वडील राजेंद्र रणदिवे यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीला या कोंडून ठेवले ठेऊन तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आल्याचाही आरोप रोहनच्या आईवडिलांवर मुलीच्या पालकांनी केला आहे. यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मुलीचा वडिलांना फोन

मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले होते, मुलीने मला फोन करुन तिला ही लोकं त्रास देत आहेत. तिला वेगवेगळ्या कारणांनी ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे मला तुम्ही घरी घेऊन जा असा फोन तिने केला होता. त्यादिवशीही मुलीला मारहाण करण्यात आली होती. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मला फोन आला की, मुलगीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कल्याणच्या रक्मिणीबाई रुग्णालयामध्ये मृतदेह ठेवल्याचेही त्यांना समजले.

ADVERTISEMENT

बहिणीला दिला चोप

मुलीचा मृतदेह कल्याणच्या रुग्णालयात ठेवल्याचे सांगितल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी तिकडे धाव घेतली. त्यावेळी रोहन म्हस्के आणि रोहनची बहीण नेहा जाधव व अन्य नातेवाईक रुग्णालयात आले होते. त्यावेळी मुलीचा मृत्यू झाल्याच्या रागातून नातेवाईकांनी रोहनला आणि त्याच्या बहिणीला चांगलाच चोप दिला. यावेळी एका महिलेने तर रोहणच्या चेहऱ्याला काळे फासले होते. टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दिनकर चकोर हे त्यावेळी तिथे उपस्थित होते. त्यानंतर कल्याणचे महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रोहण आणि त्याच्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ADVERTISEMENT

तपास गांभीर्याने

या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दिनकर चकोर यांनी सांगितले की, आम्हाला गळफास घेतल्याचा कॉल होता. मात्र आता नातेवाईकांनी आरोप केल्यामुळे त्यावर अवलंबून तपास केला जाणार आहे. मृत मुलीच्या शवविच्छेदानाचा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होणार आहेत. मृत मुलगी अल्पवयीन होती, त्यामुळे हा प्रकार गंभीर असल्याने त्याचा तपासही गांभीर्याने केला जाणार आहे.

हे ही वाचा>> Angelo Mathews : न खेळताच फलंदाज होतो बाद, ‘टाइम आऊट’ आहे तरी काय?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT