मामीचे भाच्यासोबत अनैतिक संबंध, मंजूचा मजनू झालेल्या आकाशने मामासोबतच केला कांड!
Married Woman Shocking Viral News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या बंथरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भाच्याने मामाची हत्या केल्यानंतर घडलं भयंकर!

मामीसोबत प्रेमप्रकरणामुळे घडला धक्कादायक प्रकार

पोलीस तपासात समोर आली खळबळजनक माहिती
Married Woman Shocking Viral News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या बंथरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली. रेल्वे कर्मचारी सिद्धी प्रसाद लोधीच्या हत्येचं प्रकरणाने आता नवीन वळण घेतलं आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, या घटनेमागे मृताची पत्नी मंजू आणि तिचा भाचा आकाश वर्मा उर्फ लकीचा हात आहे. पोलिसांनी मंजू आणि आकाशला अटक केली आहे. तर तिसरा आरोपी संजय कश्यप अजूनही फरार आहे. पोलिसांकडून या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
घराच्या मागे झाडीत मिळाला होता मृतदेह
25 मे रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास बंथराच्या दरियापूर येथे राहणाऱ्या सिद्धी प्रसाद लोधीचा मृतदेह घराच्या पाठीमागे झाडीत सापडला होता. सिद्धी प्रसाद रेल्वेच्या आलमबाग स्टोरमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी करत होता. घटनास्थळी त्यांची चप्पल, मोबाईल, शर्ट आणि पँट विखुरलेल्या अवस्थेत साडडली. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होता. शरीरावरही अनेक जखमा होत्या. गावातील एका तरुणाने मृतदेह पाहिला तेव्हा तातडीनं या घटनेची माहिती कुटुंबाला आणि पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
हे ही वाचा >> ShivSena UBT-MNS: 'जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल', उद्धव ठाकरेंचं मनसेसोबतच्या युतीवर सर्वात मोठं विधान!
पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. याप्रकरणी आकाश वर्माचं नाव उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस तपासात आरोपी आकाशने सिद्धीच्या हत्येच्या कटाचा खुलासा केला. त्याने सांगितलं की, सिद्धी त्याचा मामा होता. तो नेहमी मामाच्या घरी येजा करायचा. याचदरम्यान, त्याने मामी मंजूसोबत मैत्री केली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
हे ही वाचा >> सलीम कुत्ता प्रकरणी चर्चेत ते फडणवीसांशी भेट... ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाली, सुधाकर बडगुजर कोण?
आरोपी आकाशने पोलिसांना सांगितलं की, सिद्धी मद्यपान करायचा आणि जुगार खेळायचा, असं मंजू त्याला म्हणाली होती. सिद्धीचा गावातील एका विधवा महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्याची मुलीवरही वाईट नजर होती. सिद्धीची हत्या करण्यासाठी मंजूने कट रचला होता. सिद्धीचा काटा काढला नाही तर मुलांसोबत विष पिऊन मरू जाईल, अशी धमकीही मंजूने दिली होती. त्यानंतर आकाशने गोंडा येथे राहणाऱ्या संजय कश्यपला या हत्याप्रकरणात सामील केलं. आकाशने संजयला सिद्धीची हत्या करण्यासाठी 40 हजार रुपयांचं आमिष दाखवलं होतं.