सलीम कुत्ता प्रकरणी चर्चेत ते फडणवीसांशी भेट... ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाली, सुधाकर बडगुजर कोण?
सुधाकर बडगुजर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना जोर आला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी...
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
मुलावरही झाली होची मकोका अंतर्गत कारवाई
नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख डी. जी. सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पक्षाचे नेते संजय राऊत यांनी फोनद्वारे याबाबत माहिती दिल्याचेही सुर्यवंशी यांनी सांगितले.
हे ही वाचा >> वैष्णवीनंतर आशाराणीनेही स्वत:ला संपवलं! सोलापुरातील संतापजनक घटना, मुलीचे वडील म्हणाले...
सुधाकर बडगुजर यांनी परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना जोर आला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तातडीने कारवाई करत बडगुजर यांना पक्षातून काढून टाकले. या हकालपट्टीमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
सुधाकर बडगुजर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक येथील प्रमुख नेते होते. ते नाशिक जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख होते. तसंच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांचं राजकीय वजन आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव यामुळे ते सातत्याने चर्चेत राहतात. मात्र, त्यांच्याशी संबंधित काही वादग्रस्त प्रकरणांमुळेही ते गेल्या काही वर्षांत प्रकाशझोतात आले आहेत.
2024 विधानसभा निवडणूक
सुधाकर बडगुजर यांना शिवसेना (उबाठा) पक्षाने नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला, पण काही कार्यकर्त्यांना प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसंच, निवडणुकीनंतर मतमोजणीबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे पुनर्मोजणीची मागणी केली होती.










