कोरोना फेस मास्कने हत्या, सूटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह; हत्येचं कारण फक्त…

मुंबई तक

ADVERTISEMENT

boy killed girl student with covid mask stuffed body in suitcase dumped shocking story
boy killed girl student with covid mask stuffed body in suitcase dumped shocking story
social share
google news

Boy killed Girl Student With Covid Mask : एकतर्फी प्रेमातून आतापर्यंत अनेक तरूणींची हत्या झाली आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने कोरोना काळातील फेस मास्कच्या (Face mask) मदतीने तरूणीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. हिना बशीर असे या मृत तरूणीचे नाव आहे. मृत तरूणी ही आरोपी मुहम्मद अर्सनालच्या घरी त्याला भेटायला पोहोचली होती. या भेटीनंतर तरूणी अचानक गायब झाली होती. अनके दिवस तरूणीचा (Girl Student) पत्ताच लागला नसल्याने प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि टॅक्सी ड्रायव्हरच्या मदतीने घटनेचा उलगडा केला होता. (boy killed girl student with covid mask stuffed body in suitcase dumped shocking story)

ADVERTISEMENT

एकतर्फी प्रेमातून धक्कादायक घटना

27 वर्षीय तरूण मुहम्मद अर्सनाल हिनावर एकतर्फी प्रेम करत होता. अर्सनालला हिनाशी लग्न देखील करायचे होते. त्यामुळे अर्सनाल नेहमी त्याच्या मित्राला सांगायचा की, ही माझी होणारी बायको आहे. माझं लग्न होईल तर हिनाशीच होईल. अर्सनाल हिनाच्या प्रेमात इतका आकंठ बुडाला होता की, पाकिस्तान ते ब्रिटेनपर्यंत तिच्या मागे मागे फिरत होता. दरम्यान या नात्याला हिनाने नकार कळवल्यानंतर अर्सनालने तिची हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरून इंडस्ट्रियल परिसरात फेकून दिला होता.

हे ही वाचा : Basti Rape Case: 12 वर्षाच्या मुलीवर गँगरेप! भाजप कार्यकर्त्याने घरी बोलावलं आणि नंतर…

मीडिया रिपोर्टनुसार, हिना बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होती आणि ती पाकिस्तानची रहिवासी होती. चौकशीत अर्सनालने सांगितले की, कोविड काळात वापरण्यात येणाऱ्या मास्कच्या मदतीने त्याने हिनाची हत्या केली होती. अर्सनालने हिनाच्या तोंडात मास्क कोंबलं होते, ज्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता आणि तिचा मृ्त्यू झाला होता. हिनाचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह अर्सनालने एका सुटकेसमध्ये टाकून ड्रायव्हर मित्राला कार घेऊन बोलवले. या कारमध्ये अर्सनाल बॅग घेऊन गेला आणि त्याने इंडस्ट्रीयल परिसरात मृतदेहाने भरलेली सुटकेस फेकून दिली होती.

हे वाचलं का?

दरम्यान हिनाचा अनेक दिवस पत्ता न लागल्याने प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही आणि टॅक्सी ड्रायव्हरची चौकशी केली होती. या चौकशीत सीसीटीव्ही फुटेजमध्ये अर्सनाल एक वजनदार सुटकेस घेऊन घरातून निघाला असल्याचे दिसले होते. त्यानंतर त्याने हिनाच्या मृतदेह फेकून दिला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अर्सनालला ताब्यात घेऊन त्याला कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाल अर्सनालने, जाणून बूजुन हिनाच्या हत्या केली नाही. हिनाची हत्या करायची देखील नव्हते. चुकीमुळे ही घटना घडली आहे, असा त्याने जबाब दिला होता.

मीडिया रिपोर्टनुसार, हिना आणि अर्सनाला पाकिस्तानमधील एका गावात राहायचे. हिना नोव्हेंबर 2021 रोजी ब्रिटेशमध्ये शिक्षणासाठी गेली होती. तिच्या मागो माग अर्सनाल देखील आला होता. तसेच चौकशीत ही देखील गोष्ट समोर आली आहे की, अर्सनाल हिनासोबत अनेक वर्ष संपर्कात होता. तो तिच्याशी जेव्हा बोलायचा तेव्हा तिच्याशी लग्न करायचे असे नेहमी सांगायचा. याच एकतर्फी प्रेम प्रकरणातून तिची हत्या करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :जयश्रीचा ‘लग्न घोटाळा’, 35 वर्षीय महिला करायची लग्न अन् 5 दिवसातच…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT