14 वर्षांच्या मुलानं आजीला संपवलं, रात्रभर तिच्या मृतदेहासोबत अन् सकाळी उठून...

मुंबई तक

Crime News : लखनऊमधील महिलाबाद ठाणे क्षेत्रात अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्या आजीचा खून केल्याची मन्न सून्न करून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. त्याचे कारण ऐकूण आपल्यालाही धक्का बसेल.

ADVERTISEMENT

Crime News 14-year-old boy kills grandmother At Luknow
Crime News 14-year-old boy kills grandmother At Luknow
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लखनऊमधील महिलाबाद ठाणे क्षेत्रात अंगावर काटे येणारी धक्कादायक घटना घडली आहे.

point

अल्पवयीन मुलाने आपल्या आजीचा खून केल्याची मन्न सून्न करून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.

Crime News : उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊमधील महिलाबाद ठाणे क्षेत्रात अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्या आजीचा खून केल्याची मन्न सून्न करून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. खून करणारा अल्पवयीन मुलगा किशोर (वय 14) तर आजीचे वय हे 70 होते. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. खून करणाऱ्या नातवाने आपल्या आजीला मारलं त्याच खोलीत एक रात्र वास्तव्य केलं. हत्येच्या दूसऱ्याच दिवशी तो शाळेत गेला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी नातवाला ताब्यात घेतलं आहे. संबंधित प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : भाच्यावर जडला जीव, 43 वर्षांच्या मामी 22 वर्षाच्या भाच्यासोबत गेली पळून, एवढंच नाहीतर...

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, आजी आपल्या नातवासोबत राहत होती. दहा वर्षांपूर्वी किशोरच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तर त्याची आई घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर किशोरचं सर्व कर्ताधर्ता ही आजीच होती. दरम्यान दिड आठवड्यांपूर्वी मुलगा आपल्या आजीच्या घरी गेला होता आणि रात्री नऊ वाजता घरी परतला. त्यावेळी त्याने आपल्या आजीकडे शाळेच्या 'फि'ची मागणी केली. त्यावर आजीने इथं राहणार असशील तरच 'फि' भरेल, असं सांगितलं. 

दरम्यान, आरोप करण्यात आला की, नातू किशोर हा शाळेची फि न दिल्याने संतापला होता. आपली आजी झोपली असताना किशोरने उशीच्या सहाय्याने आजीचं तोंड दाबलं आणि गळा दाबत आजीचा खून केला. दरम्यान, आजीच्या मुलीने गुरूवारी आजीला अनेकदा फोनद्वारे संपर्क साधला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला आजीच्या घरात जाण्यास सांगितले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. 

अशावेळी आजीची मुलीने घटनास्थळी धाव घेतली होती. आपल्या आईला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर वृद्ध महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केलं असल्याचं सांगण्यात आलं.  

हेही वाचा : हगवणेंसारखेच प्रताप, प्रत्येक वादात त्याचं नाव, कोण आहे निलेश चव्हाण?

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आजीचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान, आजीचा नातू किशोर हा शाळेतून आल्यानंतर पोलिसांनी किशोरची चौकशी केली. ज्यात त्याने आपण आपल्या आजीचा खून केला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp