हगवणेंसारखेच प्रताप, प्रत्येक वादात त्याचं नाव, कोण आहे निलेश चव्हाण?
वैष्णवी हगवणेची ननंद करिष्मा हगवणे हीचा मित्र असलेल्या निलेश चव्हाणवर या प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मृत वैष्णवीचं बाळ घेऊन जाण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवल्याचं समोर आलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणवरही गुन्हा

निलेश चव्हाणचे 2019 मधले प्रतापही आले समोर
Vaishnavi Hagawane Case:वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाबद्दल खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. आज राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणा निलेश चव्हाण हे नावंही समोर आलं आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर आता निलेश चव्हाण याच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत.
हे ही वाचा >> अटक केली की आरोपी स्वत:हून हजर झाले? सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले 3 सवाल
वैष्णवी हगवणेची ननंद करिष्मा हगवणे हीचा मित्र असलेल्या निलेश चव्हाणवर या प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मृत वैष्णवीचं बाळ घेऊन जाण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवल्याचं समोर आलं होतं. तर दुसरीडे आता निलेश चव्हाण हा सुद्धा त्याच्या पत्नीचा छळ करत होता असं समोर आलं आहे.
पत्नीसोबतच केला विचित्र प्रकार
निलेश चव्हाणचा हिस्ट्रीसुद्धा हगवणेंसारखीच वाईट आहे. वार्जे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाणच्या या कृत्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. बेडरूममध्ये फॅनला कॅमेरा लावून खासगी क्षण त्यात रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. निलेश चव्हाणचं 2018 मध्ये लग्न झालं होतं, त्यानंतर 2019 मध्ये त्याने हे प्रताप केले होते. त्यानंतर निलेशच्या पत्नीला त्याच्या लॅपटॉपमध्ये या सर्व गोष्टी सेव्ह करुन ठेवल्याचं आढळलं होतं.
हे ही वाचा >> राजेंद्र हगवणेला अटक, पोलिसांना कसा आणि कुठे सापडला? सोबत सुशील हगवणेही...
मयुरी हगवणे यांनी केलेल्या आरोपांनुसार हगवणे कुटुंबाच्या वादांमध्येही निलेश चव्हाण सहभागी असायचा. लग्न ठरण्यापूर्वीच्या बैठकाही त्याच्या ऑफिसवर झाल्या होत्या. तो करिष्मा हगवणेचा मित्र आहे असंही मयुरी हगवणे म्हणाली होती.