बाप की कसाई? भर लग्नात वडिलांनी 5 महिन्यांच्या बाळाला छतावरून दिले फेकून, दुर्दैवी घटनेत चिमुरड्याचा मृत्यू

मुंबई तक

Crime News : आपल्याच मेहुण्याच्या लग्नात आलेल्या बॉबी नावाच्या पुरुषाने पत्नीसोबतच्या वादातून पाच महिन्याच्या बाळाची हत्या केली. पुरुषाने त्या बाळाला छतावरून फेकून दिले, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं लग्नसमारंभात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

कुमकुमचा नवरा बॉबी आणि भाऊ शिवकुमार यांनी नीलमवर प्राणघातक हल्ला केला

point

राक्षसी बापाने पाच महिन्याच्या बाळाला छतावरून फेकलं

Crime News : आपल्याच मेहुण्याच्या लग्नात आलेल्या बॉबी नावाच्या पुरुषाने पत्नीसोबतच्या वादातून पाच महिन्याच्या बाळाची हत्या केली. पुरुषाने त्या बाळाला छतावरून फेकून दिले, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं लग्नसमारंभात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बिदायूं येथील बिसाउली कोतवाली भागातील मलखानपूर गावातील आहे. 

हे ही वाचा : धाराशिव : ... तू माजलास का?', वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पुतण्याला काकाने संपवलं, जमिनीचा वाद वाईट

कुमकुमचा नवरा बॉबी आणि भाऊ शिवकुमार यांनी नीलमवर प्राणघातक हल्ला केला

19 एप्रिल रोजी प्रमोदचा मुलगा सौरभच्या लग्नाची वरात होती. बहीण कुमकुम 6 एप्रिल रोजी मोठा मुलगा प्रशांत आणि पाच महिन्यांचं बाळ सासरहून माहेरी आली होती. 17 एप्रिल रोजी, विवाह समारंभात, कुमकुमचा नवरा बॉबी आणि भाऊ शिवकुमार यांनी नीलमवर प्राणघातक हल्ला केला, अशातच ती बेशुद्ध पडली. तिला बिसाउरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान कुमकुमला तिच्या माहेरी ठेवले, तर बॉबी आणि शिवकुमार निघून गेले. 

18 एप्रिल रोजी सायंकाळी मलखानपूरला परतला आणि त्याची पत्नी कुमकुमसोबत वाद घालू लागली. अशातच कुमकुम ही इतर महिलांमध्ये गेली, तेव्हा पाच महिन्यांचं बाळ हे आईच्या मांडवीर होते. त्याचक्षणी बॉबीने पत्नीशी वाद घातल्यानंतर मांडीवरील बाळ आपल्या हातात हिसकावून घेतले. 

हे ही वाचा : MMS व्हिडिओचा पूर, ऑफिस ते बेडरुमपर्यंतची सारी गुपितं उलगडली; कोण आणतं व्हिडिओ बाहेर?

राक्षसी बापाने पाच महिन्याच्या बाळाला छतावरून फेकलं

नंतर छतावरून रस्त्यावर फेकून दिले, ज्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. लग्नातील मंडळींना त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी चिमुकल्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला अशी माहिती होती. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 
 

हे वाचलं का?