इंस्टाग्रामवर महिलेच्या नावाचं खोटं अकाउंट बनवलं, पतीला अश्लील व्हिडिओ पाठवले

मुंबई तक

Crime News : तरुणाने इंस्टाग्रामवर महिलेच्या नावाने खोटं अकाउंट बनवून मोठं कांड केल्याची घटना आहे. फेक अकाउंटचा वापर करत एका महिलेच्या पतीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची घटना आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिलेच्या नावाने खोटे अकाउंट बनवून केलं कांड 

point

इंस्टाग्रामवर खोटे अकाउंट बनवून अश्लील व्हिडिओ पाठवले

Crime News : एका तरुणाने इंस्टाग्रामवर महिलेच्या नावाने खोटं अकाउंट बनवून मोठं कांड केल्याची घटना आहे. फेक अकाउंटचा वापर करत एका महिलेच्या पतीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची घटना आहे. या प्रकरणी आरोपी 27 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना दिल्लीतील असून आरोपीची जीतू कुमार अशी  ओळख समोर आली आहे.

हे ही वाचा : भाजप नेत्याच्या सुनेनं संपवलं जीवन, पतीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप

महिलेच्या नावाने खोटे अकाउंट बनवून केली फसवणूक  

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित महिलेला आधीपासूनच ओळखत होता. तो 2022 पासून पीडितेचा पाठलाग करत होता. त्याने महिलेच्या नावाने खोटे अकाउंट सुरू केले आणि महिलांची फसवणूक सुरू ठेवली. तक्रारीच्या आधारे दिल्ली नॉर्थ इस्ट जिल्हा सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू ठेवत तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू ठेवला. 

तपासादरम्यान, पोलिसांनी सोशल मीडिया अकाउंट्सची तांत्रिकदृष्ट्या पडताळणी केली होती. पोलिसांनुसार, तपासातून समोर आले की, ज्या फेक बनावट अकाउंट्सचा वापर महिलेची बदनामी करण्यासाठी केला होता, संबंधित अकाउंट हे जीतू नावाच्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर करण्यात आले होते. मेटानं संबंधित अकाउंट्स हटवल्यानंतर तो लगेचच नवीन अकाउंट बनवायचा.

 इंस्टाग्रामवर खोटे अकाउंट बनवून अश्लील व्हिडिओ पाठवले

जीतू कुमार नावाच्या व्यक्तीने महिलेच्या नावाने इंस्टाग्रामवर खोटे अकाउंट बनवले होते, तेथे अश्लील आणि पॉर्नोग्राफीक व्हिडिओ बनवण्यात आले होते. यात महिलेचा नवऱ्याचा देखील समावेश होता. महिलेची बदनमी करून तिला मानसिक त्रास देणे हेच यामागील उद्देश होता. या बनावट खात्यांद्वारे तिचे फोटो वापरून तिच्या ओळखीच्या लोकांमध्ये तिची प्रतिमा मलीन करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.