पतीला लागलेली दुसऱ्या महिलेसोबतच्या शरीरसंबंधाची चटक, पत्नीचे अश्लील व्हिडिओ केले शूट आणि...
Crime news : पत्नीला आपल्याच पतीने अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलं. त्यानंतर तिला 10 लाख रुपये पैशांची मागणी देखील केली होती, या घटनेचा पीडितेनं पोलीस टाण्यात खुलासा केल्यानं प्रकरण समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीने पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवले
त्यानंतर 10 लाखांची केली मागणी
हादरवून टाकरणारं प्रकरण समोर
Crime news : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. पत्नीला आपल्याच पतीने अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलं. त्यानंतर तिला 10 लाख रुपये पैशांची मागणी देखील केली होती. हे प्रकरण पंचायतीपर्यंत गेले आणि त्यात तोडगा निघाला. त्यानंतर तिचा पती तिला त्रास देऊ लागला होता. पतीचे परस्त्रीसोबत प्रेमसंबंध असून तो त्या महिलेशी विवाह करू इच्छित होता, अशी माहिती समोर आली. दरम्यान, ही घटना गोरखपूर पोलीस ठाणे परिसरातील आहे.
हे ही वाचा : तरुणाने तिला गाडीवर बसण्यास जबरदस्ती केली, नंतर तिच्यावर लैंगिक शोषण केलं, ती रक्तबंबाळ अवस्थेत मध्यरात्री...
'साहेब! मला मदत करा, माझ्या पतीने...'
संबंधित प्रकरणात महिला रडत रडत पोलीस ठाण्यात गेली. तिने पोलिसांना विनंती केली की, साहेब! मला मदत करा, माझ्या पतीने माझे काही अश्लील व्हिडिओ बनवले आहेत. जेव्हा मी त्याला व्हिडिओ डिलिट करण्यास सांगितले, तेव्हा त्याने 10 लाखांची मागणी केली होती.
त्यानंतर पीडितेनं सांगितलं की, माझा लग्नापासूनच सासरच्या लोकांनी छळ केला आहे. पती सीतापूर येथील एका कारखान्यात नोकरी करतो. महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, तिने विरोध दर्शवला तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. एके दिवशी त्याने अंमली पदार्थ पाजून बेशुद्ध केलं. त्यानंतर, त्याने माझा अश्लील व्हिडिओ बनवला.
पीडितेकडे 10 लाखांची मागणी
त्यानंतर, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पीडितेला व्हिडिओ डिलिट करण्यावरून 10 लाखांची मागणी केली होती. व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची देखील धमकी देतो, असं पीडितेनं सांगितलं.










