'हत्या करून निळ्या ड्राममध्ये भरेन तुला', बायकोनं नवऱ्याला दिली धमकी
Crime News : एका महिलेनं पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली, एवढंच नव्हे तर जर कमी अधिक काही झाल्यास काका बघून घेतील, असे देखील ती म्हणाली असल्याचा संबंधित व्यक्तीचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घर विकून दिल्लीला जाण्याचा पत्नीचा आग्रह
निळ्या ड्राममध्ये टाकण्याची धमकी
Crime News : राजस्थानच्या अलवर येथून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेनं पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली, एवढंच नव्हे तर जर कमी अधिक काही झाल्यास काका बघून घेतील, असे देखील ती म्हणाली असल्याचा संबंधित व्यक्तीचा आरोप आहे. अशातच न्यायालयाच्या आदेशानुसार, चोरी, धमकी आणि फसवणूक अंतर्गत गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा : नागपूर: फटाक्यांवरून वाद, चाकूने सपासप वार करत तरुणाची केली हत्या
घर विकून दिल्लीला जाण्याचा पत्नीचा आग्रह
या प्रकरणात तक्रारदाराची ओळख अभिषेक अशी समोर आली. अभिषेकचे म्हणणे असे की, लग्न झाल्यापासून पत्नी सतत त्याचा छळ करते. ती सतत दिल्लीला जाण्यासाठी दबाव टाकत होती. घर विकून दिल्लीला जाण्याचा त्याने आग्रह धरला होता. जेव्हा अभिषेकने नकार दिला असता, कुटुंबात मोठा वाद झाला. परिस्थिती चिघळल्याने अभिषेकने तक्रार दाखल केली.
अभिषेकचे दिल्लीच्या शैलीसोबत विवाह ठरला होता. लग्नात मुलीच्या बाजूने त्याला 10 लाख रुपये देणे मान्य केले होते. तर 4 लाख रुपये बँक खात्यात ठेवण्यात आले होते. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे 20 ते 25 दिवस बरे होते, मात्र नंतर परिस्थिती असामान्य होऊ लागली.
दिल्लीत राहण्यास पत्नीची जबरदस्ती
शैलीने सुरुवातीला 20 ते 25 दिवस अभिषेककडे कोणतीही तक्रार केली नाही. मात्र नंतर तिने त्याच्याकडे दिल्लीत राहण्यास जबरदस्ती केली, राहता फ्लॅट विकण्यास देखील दबाव आणला आणि तेव्हापासून सुरू होणाऱ्या नात्यात विरजण निर्माण झालं.
हे ही वाचा : नागपूर: सुनेनं सासूचं सोनं केलं चोरी अन् विकत घेतला iPhone नंतर..
निळ्या ड्राममध्ये टाकण्याची धमकी
अभिषेकने पत्नीवर गंभीर आरोप केले, पत्नीने निळ्या ड्रममध्ये टाकण्याची धमकी दिली. तसेच तिने अभिषेक झोपलेला असताना त्याच गळा दाबला असा अभिषेकने आरोप केला, एवढंच नसून शैली म्हणाली होती की तिच्या काकांचे चांगल्या लोकांनी संबंध आहेत ते हे प्रकरण हाताळतील.
