भाऊ आधीच अत्याचाराच्या प्रकरणात तुरुंगात, आता बहिणीने केलं मोठं कांड!
Crime News : रक्षाबंधनाच्या दिवशी भावाबाबत केलेल्या कमेंटवरून जाऊ आणि भावजयीमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर देवरानीची चाकूने हत्या करून मृतदेह पाण्याच्या हौदात टाकल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाऊ आधीच अत्याचाराच्या प्रकरणात तुरुंगात
आता बहिणीने केलं मोठं कांड!
Crime News : इंदूरच्या राऊ परिसरातील न्यू नेहरू नगरमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी धक्कादायक घटना घडली. 21 वर्षीय वंदना पटेल हिची तिची जाऊ पार्वती बाई कुशवाह हिने चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वंदनाचा मृतदेह घराबाहेर असलेल्या पाण्याच्या हौदात टाकण्यात आला. शरीरावर चाकूने वार केल्याच्या खुणा आढळल्यानंतर पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता पार्वती बाईच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. फुटेजमध्ये ती पती भूपेंद्र पटेलसोबत घरातून बाहेर पडताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि अरबिंदो रुग्णालयातून तिला ताब्यात घेतले.
हेही वाचा : Maharashtra Weather : पावसाचा वेग मंदावला, शेवटच्या श्रावणी सोमवारी कसं असेल वातावरण?
एका टिप्पणीवरून दोघींमध्ये वाद सुरू झाला, अन् हत्येपर्यंत पोहोचला
पोलिसांच्या चौकशीत वंदना आणि पार्वती यांच्यात तिच्या भावावरून वाद झाल्याचे समोर आले. पार्वतीचा भाऊ एका प्रकरणात दमोहच्या तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रक्षाबंधनाच्या दिवशी वंदनाने पार्वतीच्या भावाबाबत केलेल्या एका टिप्पणीवरून दोघींमध्ये वाद सुरू झाला. घरात त्या वेळी पार्वती आणि वंदना या दोघीच होत्या. पार्वतीची मुले शाळेत गेली होती, तर तिचा पती आणि देवर रुग्णालयात दाखल होते. याचदरम्यान वाद वाढत गेला आणि आरोपानुसार पार्वतीने चाकूने वंदनाच्या मानेवर सलग दोन वार केले. गंभीर दुखापतीमुळे वंदनाचा मृत्यू झाला.
हेही वाचा : कराड: दोन वर्षांपासून आईसोबत मित्राचे प्रेमसंबंध, साथीदाराच्या मदतीने बॉयफ्रेंडला संपवलं
