लग्नाच्या 3 दिवसानंतरच रुबिनाने पतीसोबत... समोर आलं महिलेचं घाणेरडं गुपित!
Crime News : उत्तर प्रदेशातील आगरामध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना घडली आहे. लग्नाच्या अवघ्या तीन दिवसानंतर रुबिना उर्फ ताराने पती निर्मलला विष देऊन ठार मारले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उत्तर प्रदेशातील आगरामध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना घडली आहे.

लग्नाच्या अवघ्या तीन दिवसानंतर रुबिना उर्फ ताराने पती निर्मलला विष देऊन ठार मारले आहे.
Crime News : उत्तर प्रदेशातील आगरामध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना घडली आहे. लग्नाच्या अवघ्या तीन दिवसानंतर रुबिना उर्फ ताराने पती निर्मलला विष देऊन ठार मारले. त्यानंतर घरातून रक्कम आणि दागिने घेऊन पत्नी पळून गेली आहे. ही महिला पत्नी नसून एक क्रूर गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. अविवाहीत तरुणांना फसवून ती विवाह करते आणि त्यांना लुबाडते.
नेमकं प्रकरण काय?
तारा उर्फ रुबिना ही मूळची उत्तराखंड येथील उधम सिंगनगर जिल्ह्यातील होती. रुबिनाचा विवाह हा आवास कॉलनीत आगरा निवासी निर्मल सिंह येथे झाला. विवाहानंतर घरात आनंदाचा क्षण होता. मात्र, रुबिनाने आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर तिने घरातील ठेवण्यात आलेला पैसा आणि दागिने घेऊन ती फरार झाली. मृत पतीची बहीणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर रुबिनाला उत्तर प्रदेशातून तक्रार दाखल केली आहे.
पोलीस चौकशीदरम्यान, रुबिनाने केलेलं कृत्य एखाद्या थ्रिलर चित्रपटालाही लाजवून टाकणारं आहे. तिने सांगितले की, ती आधीच विवाहीत होती. तिने अशा अनेक पुरूषांसोबत विवाह केला होता. ती थोडे दिवस घरात रहायची. त्यानंतर तिथून पैसे आणि दागिने घेऊन निघून जायची.
या प्रकरणाची सुनावणी विराट कुमार श्रीवास्तव यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकिलांनी मृताची बहीण विशेष सिंह, तिचा मुलगा भरत, डॉ. प्रभात सिंग, पोलीस आणि फॉरेन्सिक विशेषज्ञांचाही यात समावेश होता. शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नॉर्मल असं नमूद करण्यात आलं. तसेच हा झालेला मृत्यू विष प्यायल्याने झाला. याच पुराव्यानीशी आता रुबिनाला दोषी ठरवण्यात आले. तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत 75 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
हेही वाचा : 70 वर्षीय भाजप नेत्याचा डान्सरसोबत अश्लील Video झाला Viral
दरम्यान, काही दिवसांपासून महिलांकडून आपल्याच पतीची हत्या करण्यात येणाऱ्या अनेक घटना घडत आहे. ज्यात उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका महिलेने आपल्याच प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली होती. नंतर त्याचा मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला होता. पती-पत्नीच्या नातेसंबंधाला काळीमा लावणाऱ्या अशाअनेक घटना देशात घडत आहेत.