Crime : आईनेच केला लेकीचा ‘छळ’, पती आणि कुटुंबीयांना अडकवण्याचा होता ‘कट’!
गुरुग्राममध्ये एका 30 वर्षीय महिलेने आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. पती आणि नातेवाईकांना अडकवण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पीडित मुलीचे वय 13 वर्षे आहे.
ADVERTISEMENT

Sexual Harassment Case : गुरुग्राममध्ये (Gurugram) एका 30 वर्षीय महिलेने आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार (Harassment) केल्याची घटना उघड झाली आहे. पती आणि नातेवाईकांना अडकवण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पीडित मुलीचे वय 13 वर्षे आहे. पोलीस तपासात सर्वकाही उघड झालं आहे. मुलीनेही वैद्यकीय तपासणीसाठी आईविरोधात जबाब नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला उत्तर प्रदेशातील अलीगढची रहिवासी आहे. 2018 मध्ये, ती तिच्या पहिल्या पतीपासून वेगळी झाली आणि तिच्या दोन मुली आणि दोन मुलांसह गुरुग्रामला आली. त्यानंतर 2021 मध्ये तिने दुसरे लग्न केले. दुसरा पती हरियाणाचा असून तो खासगी ट्रक चालक म्हणून काम करतो. महिला स्वत: सेक्टर 10 मधील एका फर्ममध्ये काम करते.
वाचा : CM शिंदेंची हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा, म्हणाले ‘ही’जबाबदारी सरकारचीच
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने तिचा पती, पतीचा भाऊ आणि चुलत भावाविरुद्ध दोन वेगवेगळ्या एफआयआरमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
महिलेने पती आणि कुटुंबावर कोणते आरोप लावले?
महिलेने ऑक्टोबरमध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. यामध्ये तिने नवरा आणि त्याच्या चुलत भावावर मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला.










