Love, Sex आणि… ‘शरीराच्या प्रत्येक भागावर त्याने..’ Facbook मित्रासोबतची ‘ती’ रात्र!
गावातून येऊन शहरात नोकरी करु बघणारी एक मुलगी. शहर तिच्यासाठी नवीन पण तिला नोकरी मिळाली आणि तिचं वलय मिळालं. मित्र मैत्रिणी मिळाल्या. तिला वाटलं यांच्यामुळे आता आयुष्य बदलले पण घडलं वेगळंच. मग तिनं ठरवलं हे सगळं फेसबुकवर सांगावं.
ADVERTISEMENT
Facebook Friend : मी वयाच्या 23 व्या वर्षी दिल्लीत (Delhi) आले. बिहार राज्यातील एक छोटसं माझं गाव. ज्यावेळी गावात होते, त्यावेळी जगण्याची अनेकं बंधनं होती, मात्र मी स्वतंत्र विचारांची होती. त्यावेळी वाटलं की, शहरात जावं आणि माझं मी आयुष्य जगावं. दिसायला मी सुंदर आहे. दिल्लीत गेल्यानंतर सरकारी नोकरीसाठी (Government Job) प्रयत्न करीन आणि त्याच बरोबर कोणत्यातरी कंपनीमध्ये रिसेप्शनिस्ट (Receptionist) म्हणूनही काम करता येईल. या काळात दिल्लीतील लक्ष्मीनगरमध्ये राहू लागले. त्यानंतर तेथील मुलींबरोबर मैत्री झाली. त्या मैत्रीच्या (Friendship) ओळखीतूनच कॉल सेंटरमध्ये (Call Cenetr) नोकरी मिळाली. त्या नोकरी नंतर मात्र रिसेप्शनिस्ट बनण्याचं स्वप्न सोडून दिलं. कॉल सेंटरमधीलच नोकरी चांगली वाटू लागली. ही नोकरी मिळाली आणि अभ्यासाला वेळ कमी पडू लागला, त्यामुळे थोडं टेन्शन वाढलं, अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी मी दुसरा काही तरी पर्याय शोधू लागले.
ADVERTISEMENT
लाईक, कमेंट आणि मैत्री
नेमकं त्याच वेळी मी फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर वेळ घालवू लागले. सोशल मीडियामुळे दोस्ती वाढू लागली. याकाळातच सोशल मीडियावर एक मित्र मिळाला. तो माझे फोटो लाईक करु लागला. कमेंट करु लागला. त्यामुळे त्याचे त्याचे अकाऊंट मी चेक करु लागले. त्यावेळी मला समजलं की, तो नोएडामधील राहणारा आहे. दिसायला सुंदर होता आणि त्यातूनच त्याच्याबरोबर मैत्रीही झाली, आणि आमचं मॅसेंजरवर बोलणं सुरु झालं.
हे ही वाचा >> MLA Disqualification Case : “गद्दारांच्या निलंबनाचं काऊंटडाऊन सुरु!”
डिस्को बार लाईफचं अप्रूप
मैत्री झाल्यानंतर माझ्या अभ्यासाविषयी आणि माझ्या ताणतणावाच्या काळातील गोष्टी त्याच्याबरोबर शेअर करु लागले. त्यानंतर त्याने सांगितले की, टेन्शन नको घेऊ, कधी तरी पार्टी वगैरे कर, डिस्कोमध्ये ये, तेव्हा तुला कळेल आयुष्यातील सुख कशामध्ये आहे ते. मी कधी पार्ट्या केल्या नाही, मात्र ते करण्याची इच्छा होती. एक दिवस संधी मिळाली आणि पार्टीला जायचं ठरलं. चॅटिंग करुन त्याच्या वर एक प्रकारचा विश्वास बसला होता. अन् एक दिवस त्याच्यावर विश्वास ठेऊन मी संध्याकाळचं त्याच्याबरोबर फिरायला गेले. त्याचदिवशी नोएड्यातील एक डिस्को बारमध्ये गेले. त्यावेळी मला दारु पिण्याची ऑफर दिली, पण मला त्यावेळी धाडस झाले नाही. त्यावेळी त्यानेही दारु घेतली नाही. ते बघून मला चांगलं वाटलं आणि विश्वास बसला. मात्र नंतर मी अगदी थोडी दारु पिणार असल्याचं त्याला सांगितले. त्यानंतर त्यानेही ते मान्य केले. दारु पिल्यानंतर मस्त डान्स केला, त्यावेळी मला ते आयुष्य सुंदरच वाटलं. वाटलं हेच खरं आयुष्य आहे. त्यावेळी त्याने मला अगदी आनंदाने माझ्या खोलीपर्यंत तो मला सोडायला आला. नको नको म्हणतानाही तो सोडायला आला, आणि म्हणाला की, तुला एकटी कसं सोडू, म्हणून मी तुला सोडायला आलो आहे.
हे वाचलं का?
मैत्री, पार्ट्या आणि दारु
मला तो सोडायला आल्यानंतर माझ्या मनात प्रचंड आनंद झाला. त्यारात्री दमून आले असले तरी मला वेगळा आनंद वाटत होता. या सगळ्यात अनेक दिवस निघून गेले. त्या मित्रावर माझा विश्वास वाढत गेला. आणि त्याच्या विश्वासावरच मी या स्टेजपर्यंत आले होते. त्याकाळात त्या मित्राशिवाय मला दुसरं काहीच दिसत नव्हतं. त्यानंतर एकदा दोनदा असच आम्ही क्लबमध्ये गेलो. पार्टी केली. मौजमस्तीही केली. पार्टीत डान्स करुन घरी जाण्यास निघाले. त्यानंतर तो मित्र माझ्या शरीराला स्पर्श करु लागला. मात्र तो स्पर्शाची मला भीती वाटली नाही. कारण त्याच्यावर माझा प्रचंड विश्वास होता. आणि असंही वाटलं की एवढं तर चालणारच.
हे ही वाचा >> Crime : जीवाचं रान करून मोबाईल चोरट्यांशी भिडली, पण… विद्यार्थीनीच्या धाडसाची कहाणी
विश्वासाला गेले तडे
नुकताच हिवाळा चालू झाला होता, दाट धुक्याचे ते दिवस होते. नेमकं त्याचवेळी त्याने मला आपल्या मित्राबरोबर पार्टीला बोलवलं. मात्र त्याच्यावर माझा विश्वास होता. मात्र एकदा मी होय नाही केलं. त्यावर तो म्हणाला की माझ्यावर विश्वास नाही का? त्यावर त्याला म्हटलेही की माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे, आणि त्याच्याबरोबर पार्टीला गेले.
ADVERTISEMENT
मित्रानेच केला घात
पार्टीसाठी त्याच्याबरोबर गेल्यानंतर आम्ही एका दूरच्या रिसॉर्ट थांबलो होतो. त्याच्या मित्राबरोबर दारु घेतली. त्यावेळी माझ्याबरोबर काही आणखीही मुली होत्या. सगळे मस्तीत होते. मात्र मला झोप येऊ लागली. दारुमुळे नशा झाली आणि मला झोप येऊ लागली,आणि मला बेशुद्ध झाल्यासारखे वाटले आणि त्यानंतर माझं मला काहीच आठवलं नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी सगळी नशा उतरली, आणि लक्षात आले की, माझे कपडे सगळे बदलले आहेत. सगळ्या शरीराला वेदना होत होत्या. तर शरीराच्या काही भागावर माझ्या नखांनी ओरबडलेल्या खाणाखुना होत्या. प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत होती. त्यावेळी मात्र मला त्याचा प्रचंड राग आला. त्यावेळी त्या माझ्या मित्राला मी खूप शोधले, मात्र तो मला मिळाला नाही. मात्र त्यावेळी एक मुलगी मला भेटली. तिचीही परिस्थिती माझ्यासारखीच झाली होती. त्यावेळी आम्ही बोलू लागल्यावर तिने तिच्या मित्राची गोष्ट सांगितली. तोही खूप विश्वासू होता. मात्र तिला हे माहिती नव्हतं की, तिच्याबरोबर असं काही तरी होईल.
ADVERTISEMENT
…तुमच्यासोबतही असं होऊ नये
ज्यावेळी या दोन मुली बोलू लागल्या त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, काही मुलांची अशी गॅंग होती. ती मुलं लांबू आलेल्या मुलींच्या शोधात असायची. ज्या मुली एकट्या असतात, राहतात. त्या मुलींचा ते पहिल्यांदा विश्वास मिळवतात. त्यानंतर त्यांच्या इज्जतीवरच हात घालतात. त्या मुलांच्या गॅंगला माहिती होते, लांबून आलेल्या मुली लगेच पोलिसात जात नाहीत. त्यावेळी आम्हालाही खूप वाटलं पण आम्ही पोलिसात गेलो नाही, आणि ही गोष्टही कोणाला सांगितली नाही. त्यानंतर त्या मुलाच्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो लागला नाही. फेसबुकवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तिथंही त्याचा संपर्क झाला नाही. त्या माझ्या घटनेनंतर मात्र तो मुलगा माझ्या नजरेलाही पडला नाही. आता त्याचा चेहराही बघावा असं वाटत नाही.मात्र त्या काळात झालेली ती जखम अजूनही मला घाबरवते. असंही वाटतं जे माझ्याबाबत झालं ते इतर कोणत्याही मुलीसोबत होऊ नये. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून अशा गोष्टीही करू नका, म्हणून आता मला माझ्या काही आठवणी तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या.
हे ही वाचा >> Maratha Reservation : बीडमध्ये शरद पवार गटाच्या पक्षाचं कार्यालय जाळलं! आंदोलन हिंसक वळणावर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT