बकऱ्या चारणाऱ्या 70 वर्षांच्या आजोबासोबत अश्लील चाळे करणाऱ्या तरूणीच्या वडिलांनी सांगितली प्रचंड धक्कादायक गोष्ट
जैसलमेर पॉर्न स्कँडलमध्ये अडकलेल्या तरूणीला आता सॉफ्टवेअर कंपनीने तिला कामावरून काढलं आहे. ज्याबाबत तिच्या वडिलांनीच ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: जैसलमेर पॉर्न व्हिडिओ स्कँडलने सर्वांनाच हादरवून टाकलं आहे. त्या तरुणीने ज्या पद्धतीने 70 वर्षीय पुरूषासोबत अश्लील चाळे केले आणि तिच्यासोबतच्या तरुणाने या सगळ्या अश्लील चाळ्यांचा व्हिडिओ शूट केला त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. आता हे देखील समोर आले आहे की या तरूणीचा हा काही पहिलाच व्हिडिओ नाही. या तरुणीने यापूर्वीही रस्त्याने जाणाऱ्यांसोबत अशाच प्रकारे कृत्य केलं आहे. दरम्यान, आता या तरुणीच्या वडिलांनी तरुणीबाबत काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने आतापर्यंत गाडीमध्ये इतर काही जणांसोबत देखील अश्लील व्हिडिओ बनवले आहेत. खरंतर हे व्हिडिओ मुलीचा मित्रच रेकॉर्ड करायचा. यानंतर, या व्हिडिओंमधील, मुलगी तिचा चेहरा ब्लर करायची आणि तिचा आवाज बदलायची आणि नंतर हे व्हिडिओ पॉर्न साइट्सवर विकायची. या बदल्यात तरुण आणि तरुणीला मोठी रक्कम मिळत असे.
हे ही वाचा>> बकऱ्या चारणाऱ्या वृद्ध व्यक्तीसमोर न्यूड झाली अन्... अश्लील चाळे करणारी तरुणी निघाली सॉफ्टवेअर इंजिनिअर, पुढे तर...
तरुणीच्या कुटुंबीयांना बसला प्रचंड धक्का
जैसलमेर पॉर्न व्हिडिओ स्कँडलमध्ये सहभागी असलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांना तिच्या अटकेनंतर प्रचंड धक्का बसला आहे. ज्या मुलीला त्यांनी शिकवलं आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर बनवलं, ती मुलगी अशा वाम मार्गाला कशी लागली? यावर त्यांना विश्वासच बसत नाही. ज्या मुलीला त्यांनी उच्च शिक्षणासाठी दिल्लीला पाठवले आणि स्वतःच्या पायावर उभे केले, ती या दलदलीत कशी अडकली? असे प्रश्न त्यांना पडत आहे. ज्या मुलीच्या शिक्षणासाठी कुटुंबाने कर्ज घेतले होते, त्या मुलीने हे नेमकं केलं तरी काय?
प्रत्यक्षात ही तरूणी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तिचे वडील जिथे राहतात त्या भागात त्यांचं एक दुकान आहे. जेव्हा मुलीच्या कृत्याबद्दल कुटुंबाला कळलं तेव्हा संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, या प्रकरणानंतर समाजात आणि शहरात त्यांची प्रचंड बदनामी झाली आहे आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
तरूणीला कंपनीने कामावरून काढून टाकलं, वडील ढसाढसा रडले...
प्रत्यक्षात पोलिसांनी त्या तरुणाला आणि तरुणीला न्यायालयात हजर करण्यात आले. ज्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. यावेळी मुलीचे कुटुंबही तिथे उपस्थित होते. मुलीचे आईवडील आणि कुटुंबातील सदस्य खूप अस्वस्थ होते. यावेळी, मुलीच्या वडिलांनी रडत रडत आपल्या मुलीबद्दल सांगितलं.
हे ही वाचा>> बकऱ्या चारणाऱ्या आजोबासोबत न्यूड होऊन अश्लील चाळे करणाऱ्या तरुणीचा आणखी एक Video आला समोर, दुसऱ्या तरुणासमोरही...
त्यांनी सांगितले की, कर्ज घेऊन मुलीला उच्च शिक्षणासाठी दिल्लीला पाठवले होते. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर झाली. तिला कंपनीत नोकरीही मिळाली होती. वडील पुढे म्हणाले की, त्यांची मुलगी कंपनीतील दुसऱ्या मुलीच्या संपर्कात आली आणि तिनेच तिला या चुकीच्या मार्गावर नेले. अधिक पैसे कमविण्याच्या लोभात तिने या दलदलीत अडकली.
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, 'या प्रकरणानंतर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. मी माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज घेतले होते जे अद्याप फेडलेले नाही. कंपनीने देखील मुलीला नोकरीवरून काढून टाकले आहे. या प्रकरणानंतर, मी समाजासमोर जाऊ शकत नाही.'
जैसलमेरच्या व्हिडिओमध्ये काय दिसलं?
व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसते की, जैसलमेरच्या वाळवंटी भागात गाडी अचानक थांबते. ड्रायव्हिंग सीटवर बसलेला तरुण सगळं रेकॉर्ड करतो. त्याच्या शेजारी एक मुलगी नग्न बसली आहे. गाडी समोर शेळ्या चरणाऱ्या एका 70 वर्षांच्या वृद्धाजवळ ती थांबते. तरुणी गाडीचा दरवाजा उघडते आणि नग्नावस्थेतच त्या वृद्धाशी बोलू लागते.
व्हिडिओमध्ये पुढे असे ऐकू येते की, मुलगी आणि तिचा मित्र वृद्धाशी अश्लील बोलतात आणि त्या वृद्ध व्यक्तीला तरूणीसोबत अश्लील कृत्य करण्यास प्रवृत्त करतात. ती तरूणी स्वतः त्या वृद्ध व्यक्तीशी अश्लील वागते आणि मग तो वृद्ध तरुणीसोबत अश्लील चाळे करू लागतो. तरुणी गाडीतून नग्न अवस्थेत बाहेर येते आणि नंतर त्या वृद्धासोबत अश्लील कृत्ये करते. दरम्यान, मुलीचा मित्र संपूर्ण व्हिडिओ बनवतो आणि नंतर हा व्हिडिओ एका पॉर्न साइटवर अपलोड होते.