Dombivli Crime: भयंकर… चाकू हातात घेत मित्राचा पाठलाग, हत्येचं कारण काय?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

A shocking incident has taken place in Tata Power area of Dombivli where a youth killed his friend over a petty dispute
A shocking incident has taken place in Tata Power area of Dombivli where a youth killed his friend over a petty dispute
social share
google news

Crime News: डोंबिवली: किरकोळ कारणावरून मित्रानेच मित्राची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील (Dombivli) टाटा पावर परिसरात काल (25 जून) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शैलेश शीलवंत असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी आरोपी किरण शिंदे याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान चाकूने भोसकल्यानंतर शैलेश जीव वाचवण्यासाठी काही अंतरापर्यंत पळत गेला. यावेळी आरोपी किरण देखील त्याच्या मागावर होता. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने काही अंतरावरच शैलेश जमिनीवर कोसळला व त्याचा मृत्यू झाला. (friend murder accused arrest crime news dombivli police cctv footage)

ADVERTISEMENT

हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेरात कॅद झाला आहे. धक्कादायक, म्हणजे आजूबाजूच्या परिसरात पोलिसांनी चौकशी केली असता कोणी काहीच माहिती दिली नाही, मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अवघ्या तासाभरात किरण शिंदे याची ओळख पटवत त्याला बेड्या ठोकल्या.

हे ही वाचा>> राहुल हांडोरेने पुण्यातच रचलेला दर्शना पवारच्या हत्येचा कट?, ‘त्या’ दुकानामुळे…

डोंबिवली पूर्वेकडे कल्याण-शिळ टाटा पावर परिसरात शैलेश शीलवंत हा तरुण राहत होता. शैलेश रिक्षा चालक असून त्याचे नाका कामगार असलेल्या किरण शिंदे यांच्याशी ओळख होती. शनिवारी रात्रीच्या सुमारास या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून किरण हा शैलेशवर संतापला होता. याच वादातून किरणने शैलेशला टाटा पावर परिसरात एका इमारती शेजारी गाठले आणि शैलेशवर चाकूने हल्ला केला.

हे वाचलं का?

आरोपी किरण शिंदेला अटक

 

हल्यानंतर जीव वाचवण्यासाठी शैलेशने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने शैलेश जमिनीवर कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने तपास सुरू केला. आजूबाजूला चौकशी केली असता कुणी काहीच माहिती देत नव्हते. अखेर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Pune, MPSC: आधी दर्शना पवारला क्रूरपणे मारलं, आता राहुल हांडोरे म्हणतो; मला…

सीसीटीव्हीमध्ये आरोपी किरण शिंदे शैलेशचा पाठलाग करत असताना दिसून आला. पोलिसांनी शिंदे यांची ओळख पटवून त्याला अवघ्या तासाभरात याच परिसरातून अटक केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT