Crime News: हॉटेलमध्ये सेक्स करताना तरुणीचा मृत्यू! गुजरातमध्ये हे काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 गोरखपूरमध्ये कारने चिरडून तरुणीचा मृत्यू
गोरखपूरमध्ये कारने चिरडून तरुणीचा मृत्यू
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेलमध्ये गेल्यावर त्या कपलसोबत नेमकं काय घडलं?

point

पोलिसांनी दिली खळबळजनक माहिती

point

शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती आली समोर

Women Dies During Sex Crime News: गुजरातच्या नवसारी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेमुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शारिरीक संबंध केल्यामुळं एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्स करताना तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून खूप रक्तस्त्राव झाल्याने ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तरुणीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्याल आलं होतं. परंतु, तरुणीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी आरोपी भार्गवला अटक केली. 

या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तरुणीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु केला. सेक्स दरम्यान तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून खूप रक्तस्त्राव झाल्यानं तिचा मृत्यू झाला, अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला अटक केली.

हे ही वाचा >> Abhishek-Aishwarya Divorce: ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा होणार घटस्फोट? 'त्या' बर्थडे पार्टीत नेमकं काय घडलं?

याप्रकरणी पोलिस अधिक्षक सुशील अग्रवाल यांनी माहिती दिली की, आयपीसीच्या कलम 105,238 नुसार तक्रार दाखल करण्यात आली होती. 
दोघेही शारिरीक संबंध करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. पीएम रिपोर्टनुसार समजलं की, शारिरीक संबंधावेळी तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर जखमा झाल्या होत्या. ज्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Viral: संध्याकाळ होताच नागीण उगवते सूड! 5 जणांना डसली अन् गावात...

तसंच तरुणीला रुग्णालयातही दाखल केलं नव्हतं. काही वेळानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी भार्गवला अटक  केलीय. या प्रकरणी कसून चौकशी केली जात आहे. त्यानुसारच पुढील कारवाई केली जाईल. नवसारी पोलिसांनी याप्रकरणी दिलेली माहिती अशी की, शरिरीक संबंधावेळी तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर जखम झाल्यानं खूप रक्तस्त्राव झाला. त्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला, असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT