अॅपमुळे कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, तुमचं कुटुंब असं उद्ध्वस्त होऊ द्यायचं नसेल तर….
आजकाल अॅपच्या माध्यमातून लोन घेण्याच फॅड आलंय. अनेकजण या अॅपच्या माध्यमातून छोट छोट कर्ज घेऊन लोनच्या जाळ्यात असे फसतात की पुढे जाऊन त्यांच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. अशीच एक घटना आता मध्य प्रदेशमधील भोपाळमधून समोर आली आहे.
ADVERTISEMENT

आजकाल डिजिटल अॅपच्या माध्यमातून लोन घेण्याच फॅड आलंय. अनेकजण या अॅपच्या माध्यमातून छोट छोट कर्ज घेऊन लोनच्या जाळ्यात असे फसतात की पुढे जाऊन त्यांच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. अशीच एक घटना आता मध्य प्रदेशमधील भोपाळमधून समोर आली आहे. या घटनेत एका लोन अॅपमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय. दोन मुलांना विष देऊन पती-पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. अशाप्रकारे कुटुबियांच्या या सामूहिक आत्महत्येने देश हादरला. त्यामुळे जर तुम्हाला देखील तुमचं कुटुंब असं उद्ध्वस्त होऊ द्यायचं नसेल लोन घेण्यापुर्वी खालील दिलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.
‘या’ गोष्टींची काळजी घ्या
रिझर्व्ह बँकेच्या कठोर निर्देशांनंतरही अनेक प्रकारचे बनावट कर्ज अॅप लोकांची फसवणूक करून मोठी कमाई करत आहेत. या डिजिटल लोन अॅप्सवरून कर्ज घेतल्यानंतर वसुली करताना लोक इतके बळी पडतात की, त्यांच्यासमोर शेवटी आत्महत्येशिवाय पर्यायच उरत नाही. जर तुम्ही डिजिटल लोन अॅपच्या मदतीने कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर अत्यंत सावधगिरीने निर्णय़ घ्या. अशा प्रकारचे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आरबीआय काही अधिकार देते, जे तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा : Crime : ‘या’ अॅपमुळे कुटुंबच संपलं! मुलांना दिलं विष अन् पत्नीसह घेतला गळफास
1) डिजिटल पद्धतीने कर्ज घेण्यापूर्वी, कर्जदात्यांकडून आकारले जाणारे शुल्क आधी व्यवस्थित तपासून घ्या. कर्ज मंजूरीपूर्वी ग्राहकाला Key Fact Statement द्यावे लागते, जे ग्राहकाने पूर्णपणे वाचले पाहिजे. कर्जावर आकारले जाणारे वार्षिक व्याज, अर्ज शुल्क, प्रक्रिया शुल्क, विलंब शुल्क, कर्ज घेण्याची किंमत याबद्दल ग्राहकाला माहिती असणे आवश्यक आहे.
2) बँकेने किंवा डिजिटल कर्ज पुरवठादाराने जे काही कर्ज मंजूर केले आहे, ते थेट तुमच्या खात्यावर आले पाहिजे. एकदा तुमचे कर्ज बँकेने मंजूर केले आणि कर्जाची रक्कम कोणत्याही थर्ड पार्टीकडे जाऊ नये,याची काळजी घेतली पाहिजे. तसेच कर्ज मंजूरीपासून ते इतर सर्व अटी व शर्तींची माहिती कर्जदाराने मेलवर माहिती पाठवली पाहिजे.










