काश्मीरमध्ये प्रचंड मोठी जीवितहानी, एका क्षणात 44 जणांचा मृत्यू; 'ती' आपत्ती आणि...
Jammu Kashmir Kishtwar Cloudburst: जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमधील मचैल माता मंदिराजवळ मोठी ढगफुटी झाली. येथे ढगफुटीमुळे तब्बल 44 जणांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत 50 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
ADVERTISEMENT

जम्मू: जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुरानंतर मोठी जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान 44 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, सुमारे 120 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर सुमारे 200 हून अधिक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, किश्तवारमध्ये ढगफुटीच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. या दरम्यान, गृहमंत्र्यांनी आश्वासन दिले की, केंद्र सरकार प्रत्येक परिस्थितीत जम्मू आणि काश्मीरच्या जनतेसोबत खंबीरपणे उभे आहे.
आतापर्यंत किती लोकांचा मृत्यू?
किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या विध्वंसात आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, येथील परिस्थिती लक्षात घेता मृतांचा आकडा अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय 220 जण बेपत्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
हे ही वाचा>> उत्तराखंड प्रलय : पुण्यातील 24 जणांचा ग्रुप बेपत्ता..35 वर्षानंतर चारधामला फिरायला गेले अन् असं काही घडलं..
दरम्यान, या ढगफुटीमध्ये सीआयएसएफचे दोन जवानही मृत्युमुखी पडले आहेत. याशिवाय, 120 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कंट्रोल रूमशी कसा साधणार संपर्क?
या दुर्घटनेनंतर प्रशासनाने तात्काल एक कंट्रोल रूम स्थापन केलं आला आहे. ज्याद्वारे मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे. जिथे ढगफुटी झाली तिथून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर कंट्रोल रूम सुरू करण्यात आलं आहे. कंट्रोल रूममध्ये 5 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. लोक 9858223125, 6006701934, 9797504078, 8492886895, 8493801381 आणि 7006463710 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.










