…अन् माकडांच्या टोळक्याने मुलाचं पोट फाडलं, नेमकं घडलं काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

gujarat gandhinagar small boy killed gang monkeys attack
gujarat gandhinagar small boy killed gang monkeys attack
social share
google news

Gujarat Crime News : गुजरातमधील गांधीनगरमध्ये (Gandhinagar) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. माकडांच्या (monkeys) टोळक्याकडून 10 वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला (Attack) करुन तिला क्रूरपणे फाडून ठार करण्यात आले आहे. ही घटना गांधीनगरमधील सालकी गावात घडली आहे. मित्रासोबत खेळत असताना माकडांच्या टोळक्याने 10 वर्षाच्या लहान मुलावर हल्ला केला. हा हल्ला इतका क्रूरपणे करण्यात आला होता की, माकडाने आधी मुलाचे पोट फाडून आतडे बाहेर काढले होते. ही घटना लोकांच्या लक्षात येताच लोकांनी माकडांच्या हातून मुलाची सुटका करून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (gujarat gandhinagar small boy killed gang monkeys)

ADVERTISEMENT

माकडाने पोट फाडले

गांधीनगरमधील सालकी गावात लहान मुलावर माकडाने हल्ला करुन ठार केल्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

हे ही वाचा >> Crime : … अन् मालकिणीने नोकराचा कापला प्रायव्हेट पार्ट, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

मित्रांनी पळ काढला

माकडाने हल्ल्यात ठार झालेल्या मुलाचे नाव दीपक ठाकूर असे आहे. दीपक ठाकूर हा मुलगा गावातील मुलांसोबत खेळत होता. तो खेळत असतानाच माकडाच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला करुन त्याला जखमी केले होते. माकडांच्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याने मुलांनी घाबरून पळ काढला मात्र दीपक माकडांच्या तावडीत सापडला. त्यानंतर त्याच्यावर जोरदार हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी करण्यात आले.

हे वाचलं का?

आतडे बाहेर काढले

माकडांनी यावेळी त्याच्या पूर्ण शरीरावर हल्ला करुन त्याचे पोट फाडले होते. यावेळी त्याच्या पोटातील आतडेही बाहेर काढण्यात आले. या हल्ल्यात दीपक गंभीर जखमी झाला होता. ही घटना लोकांच्या लक्षात येताच लोकांनी माकडांना हुसकावण्याच प्रयत्न करुन माकडांच्या हातातून त्याची सुटका करुन घेतली. त्यानंतर दीपकला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले.

हे ही वाचा >> Solapur: हनुवटीवर रायफल ठेवून दाबला ट्रिगर, पोलीस कॉस्टेबलने का केली आत्महत्या?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT