विवाहित प्रेयसीसोबत हॉटेलच्या खोलीत गेला अन् घडलं भयंकर, धक्कादायक प्रकार उघडकीस
एक तरुण आपल्या विवाहित प्रेयसीला हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला. थोड्या वेळाने काम आहे असं सांगून एकटाच हॉटेलबाहेर पडला. कर्मचाऱ्यांनी नंतर रुम उघडून बघितलं असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रोहतकमधील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विवाहित प्रेयसीसोबत हॉटेलच्या खोलीत गेला अन् घडलं भयंकर
धक्कादायक प्रकार उघडकीस
Crime News : एका हॉटेलमध्ये विवाहित महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सकाळी एका युवकासोबत हॉटेलमध्ये आलेल्या या महिलेचा मृतदेह खोलीत आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख रुबी म्हणून झाली आहे. तिच्यासोबत हॉटेलमध्ये आलेला युवक नीरज हा महिलेच्याच गावातीलच रहिवासी असल्याचे समजते. हरियाणातील रोहतक येथील ही घटना आहे.
हॉटेलमध्ये खोली घेतली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (25 ऑगस्ट) सकाळी रुबी आणि नीरज यांनी हॉटेलमध्ये खोली घेतली होती. काही वेळानंतर नीरज लवकरच परत येतो असे सांगून हॉटेलबाहेर पडला, मात्र तो खूप वेळ झाला तरी परत आला नाही. यामुळे संशय आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खोलीची पाहणी केली असता रुबी मृतावस्थेत आढळून आली.
हे ही वाचा : Personal Finance: बाजार कोसळला म्हणून SIP थांबवणार? जरा थांबा अन्...
गळा आवळून हत्या
प्राथमिक तपासात महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. घटनास्थळी फॉरेन्सिक (FSL) पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी हॉटेलच्या खोलीतून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पीजीआय रुग्णालयात पाठवला असून हॉटेलचे रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात आहे.
हे ही वाचा : मॉडेलवर घरात घुसून चाकूने सपासप वार, जीम ट्रेनरने कशामुळे केली हत्या?
हॉटेलच्या खोलीत काय घडलं?
या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली असून हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर नीरजने आपल्या घरी जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, दोघांमधील संबंध काय होते आणि हॉटेलमध्ये नेमके काय घडले, याचा शोध घेतला जात आहे. नातेवाईकांचे जबाब आणि तपासात समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
