पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, मित्राने मित्रालाच संपवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

immoral relationship with wife man killed her friend mumbai crime news
immoral relationship with wife man killed her friend mumbai crime news
social share
google news

देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना वाढत चालल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका अनैतिक संबंधाच्या (immoral relationship) संशयावरून एका मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडलीय. दिनेश प्रजापती 38 वर्षीय असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या हत्येनंतर आरोपीने मित्राचा मृतदेह 10 किलोमीटर लांब घोडबंदर जंगलात नेऊन जमीनीत गाडला होता. यानंतर आरोपीने पोलिस (Police) ठाणे गाठून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सुरुवातीला पोलिसांना आरोपीवर संशय आला नाही, मात्र घटनास्थळावरून मृतेदह (Dead Body) सापडल्यानंतर पोलिसांनी घटनेचा गांभीर्याने तपास सुरु केला. (immoral relationship with wife man killed her friend mumbai crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेशने दिलेल्या माहितीवर सुरूवातीला कोणाचाच विश्वास बसला नाही.पण नंतर पोलिसांनी आरोपीने दिलेल्या संपूर्ण माहितीचा तपास करायला सुरूवात केली. त्यानुसार घोडबंदर हायवेच्या पाली जंगल परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. या तपासात आरोपी स्कूटीवरून सफेद कलरच्या प्लॅस्टीक बॅगमधून काहितरी घेऊन जात होता. हे फुटेज सापडल्यानंतर पोलीस मृतक दिनेश प्रजापतीच्या मृतदेहापर्यंत पोहोचली,अशी माहिती डीसीपी झोन 12 चे स्मिता पाटील यांनी दिली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास पीआय प्रवीण राणे यांच्या नेतृत्वाखालील गठीत टीम करत होती.

हे ही वाचा  : हत्याकांड घडलेला ‘तो’ फ्लॅट आमदार गीता जैन यांच्या पतीचा

दिनेश प्रजापती हा कांदिवली ईस्टमधील पोईसर काजूपाडा परीसरात राहतो. त्याचे लग्न झालेल आहे. दिनेशचे कपड्याचे दूकान आहे. दिनेशच्या घरी आणि दुकानात सुरेश सीसीटीव्ही कॅमेरा लावायला आला होता. या कामाचे पैसे बाकी होते. सूरेश हा बोरीवलीच्या कस्तुरबा परिसरात राहायचा, त्याच्यासोबत त्याची बायको राहते. सुरेशचे सीसीटीव्ही खरेदी, विक्री, रिपेयरींग, इन्स्टॉलेशनचे काम करायचा.याच कामा संदर्भात सुरेशची दिनेशची मैत्री झाली होती. दरम्यान दिनेशची सुरेशच्या बायकोशी जवळीक वाढली होती. या गोष्टीची माहिती शेजाऱ्यांच्या माध्यमातून सुरेशला लागली होती. या प्रकरणावरून मोठे भांडण देखील झाले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

1 जुनला दिनेश सुरेशच्या घरी गेला होता. त्या दिवसापासून दिनेश बेपत्ता झाला होता. यानंतर सुरेश पोलिस ठाण्याक जाऊन सर्व घटनाक्रम सांगितला होता. पोलिसांनी या प्रकरणी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांना एका फुटेजमध्ये आरोपी स्कुटीवरून मित्राचा मृतेदह घेऊन जाताना दिसला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करतायत.

हे ही वाचा  : 28 मुलांवर बलात्कार आणि हत्या, क्रूर सीरियल किलरची थरारक कहाणी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT