दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजारच्या तरूणीची हत्या, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

​​​​​​​Kalyan Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याने कल्याणमध्ये घरात घुसून पाच जणांनी मारहाण केली आहे. या मारहाणीदरम्यान, मध्यस्थी करण्यास गेलेल्या तरुणीवर जीवघेणा हल्ला करत हत्या करण्यात आली.

ADVERTISEMENT

तरुणीची हत्या
तरुणीची हत्या
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दारुसाठी पैसे न दिल्याने पाच जणांनी घरात घुसून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला आहे.

point

कल्याणमधील काळीज हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

point

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी संबंधित पाच आरोपींना गजाआड टाकलंय.

Kalyan Crime News: कल्याण: दारुसाठी पैसे न दिल्याने 5 जणांनी घरात घुसून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यादरम्यान, मध्यस्थी करण्यास आलेल्या 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. मयत मुलीचं नाव हे सानिया बागवान आहे. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी संबंधित पाच आरोपींना गजाआड टाकलंय. यापुढील तपास पोलीस करत असल्याचं सांगण्यात येतंय.

काय होतं प्रकरण?

कल्याणच्या इंदिरानगरातील परिसरात निसार सय्यद हे वास्तव्यास आहेत. याच परिसरात गुलाम शेख नावाचा एक व्यक्ती वास्तव्यास आहे. गुलाम शेख यानं निसार सय्यदकडे दारू पिण्यास पैशांची मागणी केली होती. त्यावेळी निसार सय्यदने पैसे देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्या दोघांमध्ये क्षुल्लक वाद झाला.

हे ही वाचा>> पुण्यात बबिताचा मृतदेह बाईकवरून नेत होता पती राकेश, आधी गळा आवळला अन् नंतर...

या झालेल्या वादानंतर प्रकरण निवळल्याचं वाटू लागलं. निसार हा घरात जेवण करताना गुलाब शेखचा मुलगा घरात आला. त्यांनी निसार यांना वडिलांसोबत वाद का घातला याबाबत जाब विचारण्यात आला. त्यावरून अब्दुलने निसार सय्यादवर एका लाकडी दांड्यानं हल्ला केला. या हल्लादरम्यान निसारची लेक सानिया बागवान मध्यस्थी करण्यास आली होती.

मध्यस्थीसाठी आलेल्या युवतीची हत्या

मध्यस्थी करताना गुलाम शेख अब्दुलने त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या शोएब शेख, अजित शेख आणि शाहिद शेख यांनी वडील आणि मुलीला मारहाण केली. या मारहाणी वेळी निसारती मुलगी सानिया बागवानला मध्यस्थी करण्यास आली.

हे ही वाचा>> महाराष्ट्रात 'या' 16 ठिकाणी होणार मॉक ड्रिल, सुरक्षेच्या दृष्टीनं तीन स्तरांमध्ये विभागणी, कशी असेल प्रक्रिया?

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले. या प्रकरणात एक तासाच्या आतमध्ये कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पुढील तपास केला. मात्र, दारूसाठी पैसे मागितल्यानंतर झालेल्या वादातून एका निष्पाप तरुणीची हत्या झाल्यानं एकच खळबळ उडालीय.

हे वाचलं का?

    follow whatsapp