पत्नीला प्रियकरासोबत पाहिलं अशा अवस्थेत; नंतर पतीने तिच्या प्रियकरावरच.... नेमकं काय घडलं?
उत्तप्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. यावेळी एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं आणि त्यामुळे रागात येऊन पतीने त्यांच्यावर हल्ला केला. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पतीने पाहिलं आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत

पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहिल्यानंतर पतीने काय केलं?

पतीने पत्नीच्या प्रियकरावरच केला हल्ला
Gonda Crime News: उत्तप्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं आणि त्यामुळे रागात येऊन पतीने त्यांच्यावर फावड्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्रियकराला जागीच ठार मारण्यात आलं. तसेच, पत्नीसुद्धा गंभीररित्या जखमी झाली असून तिला उपचारासाठी लखनऊमध्ये दाखल केलं असल्याचं सांगितलं जात आहे.
ही घटना देहात कोतवाली परिसरातील खोरासा गावाजवळ घडल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रिझवान त्याच्या 26 वर्षीय पत्नीसोबत म्हणजेच माजियासोबत गावातील एका खाजगी शाळेजवळ राहत होता. ज्यादिवशी ही घटना घडली, त्या रात्री रिझवान त्याच्या घरी नव्हता. त्याच वेळी माजियाचा 36 वर्षीय प्रियकर माजियाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. काही वेळानंतर, जेव्हा रिझवान परत त्याच्या घरी आला आणि तेव्हा त्याने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले.
हे ही वाचा: 'सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये हाकलून द्या..', असं म्हणालेले लोक, त्याच सीमाने 'ऑपरेशन सिंदूर'वर..
रागात रिझवानने उचललं मोठं पाऊल
आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत अशा अवस्थेत पाहिल्यानंतर रिझवानने रागात जवळ असलेलं फावडं उचलंल आणि त्या दोघांवर हल्ला केला. या हिंसक हल्ल्यात माजियाचा प्रियकर सर्वेशचा जागीच मृत्यू झाला आणि माजिया गंभीररित्या जखमी झाली. नातेवाईकांनी तिला त्वरीत जिल्हा रुग्णालयात उपाचारांसाठी नेले आणि तिथल्या प्राथमिक उपचारांनंतर तिला लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला.
हे ही वाचा: मुरीदकेमध्ये मोठा दहशतवादी झाला ठार? 'तो' लष्कर कमांडर दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत झाला सामील!
पोलिसांनी केली कारवाई
पोलिसांनी यावर त्वरीत कारवाई करत आरोपी रिझवानला ताब्यात घेतलं. पोलीस अधिकारी मनोज कुमार रावत यांनी सांगितल्याप्रमाणे, कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेने जवळील परिसरात खळबळ उडाली आहे आणि पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.