जालना : मामीच्या मदतीने मामाचा आपल्याच भाचीवर लैंगिक अत्याचार, तब्बल दोन वर्षांपासून अल्पवयीन पीडितेसोबत...

मुंबई तक

जालन्यात मामाने आपल्या पत्नीच्या मदतीने अल्पवयीन भाचीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मामाच्या विरोधात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी आणि संबंधित मामीच्या विरुद्ध शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

मामीच्या मदतीने मामाचा आपल्याच भाचीवर लैंगिक अत्याचार
मामीच्या मदतीने मामाचा आपल्याच भाचीवर लैंगिक अत्याचार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मामीच्या मदतीने मामाचा आपल्याच भाचीवर लैंगिक अत्याचार

point

तब्बल दोन वर्षांपासून अल्पवयीन पीडितेसोबत घृणास्पद कृत्य

Jalana Crime: जालन्यात माणूसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त समोर आली आहे. मामाने आपल्या पत्नीच्या मदतीने अल्पवयीन भाचीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी मामाच्या विरोधात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी आणि संबंधित मामीच्या विरुद्ध शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनी आरोपी मामाला देखील अटक केल्याची माहिती आहे. 

दोन वर्षांपासून पीडितेवर लैंगिक अत्याचार 

पोलिसांच्या तपासानुसार, कौटुंबिक वादातून पीडितेच्या आईने तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर, संबंधित महिलेने दुसरं लग्न केलं. त्यावेळी, महिलेच्या दुसऱ्या पतीने तिच्या पहिल्या मुलीला सोबत ठेवण्यास नकार दिला होता आणि यामुळेच 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मामाच्या घरी राहू लागली. दरम्यान, पीडितेच्या मामाने मागील दोन वर्षांपासून दारूच्या नशेत तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर, अल्पवयीन पीडिता कशीबशी आरोपीच्या घरातून पळून तिच्या वडिलांजवळ पोहोचली आणि तिच्यासोबत घडलेली घटना तिच्या आजीला सांगितली. 

हे ही वाचा: जीजूने पटवली मेहुण्याचीच पत्नी, अनैतिक संबंधाची भनक लागताच मेहुणा चवताळला अन् भयानक हत्याकांड

पोलिसांनी दिली माहिती 

त्यानंतर, आपल्या आजीसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून पीडितेने तक्रार दाखल केली आणि तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. खरं तर, 26 डिसेंबर रोजी या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. त्यावेळी, आरोपी मामानेच पोलीस स्टेशनमध्ये आपली भाची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रारदार हा मुलीचा मामा असल्याकारणाने, सुरूवातीच्या तपासात पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिलांची चौकशी केली. तपासादरम्यान, मुलीचे खरे वडील हिंगोली येथे राहत असून तिची आई तिच्या दुसऱ्या पतीसोबत राहते असल्याचं आढळून आले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी जाऊन प्रकरणाचा तपास केला आणि अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचं सत्य समोर आलं. त्यानंतर, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मामाला अटक केली. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कदीम जालना पोलिस ठाण्याच्या पिंक टीमकडून केला जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp