कल्याण हादरलं! एक व्हिडीओ अन् सात तरुण, तरुणीने गच्चीवरून उडी घेत संपवलं आयुष्य
–मिथिलेश गुप्ता, कल्याण कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेनं तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. एका तरुणीने गच्चीवरून खाली उडी मारून आयुष्य संपवलं. तरुणीच्या मृत्यूचं कारण समोर आल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसला. कारण होत मागील दीड वर्षांपासून सात तरुणांकडून केला जात असलेला अत्याचार. हे तरुण पीडित तरुणीला व्हिडीओला व्हायरल करण्याची धमकी देत होते. यात एक तरुणी ७ तरुणांना मदत करत […]
ADVERTISEMENT
–मिथिलेश गुप्ता, कल्याण
ADVERTISEMENT
कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेनं तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. एका तरुणीने गच्चीवरून खाली उडी मारून आयुष्य संपवलं. तरुणीच्या मृत्यूचं कारण समोर आल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसला. कारण होत मागील दीड वर्षांपासून सात तरुणांकडून केला जात असलेला अत्याचार. हे तरुण पीडित तरुणीला व्हिडीओला व्हायरल करण्याची धमकी देत होते. यात एक तरुणी ७ तरुणांना मदत करत होती.
कल्याण पूर्व परिसरात एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. आत्महत्या केलेल्या तरूणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका मुलीच्या मदतीने ७ तरुण गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते.
हे वाचलं का?
दीड वर्षांपासून होत असलेल्या अत्याचारांना कंटाळून तरुणीनं राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांना आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट मिळाली असून, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
पीडितेनं बारावीची परीक्षा दिली होती आणि नुकताच तिचा निकालही आला होता. बारावीच्या परीक्षेत तिला ७१ टक्के पडले होते. तिच्या आत्महत्येनंतर या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मयत तरुणीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळली.
या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. सुसाईड नोटमधील मजकुरामुळे पोलीसही थक्क झालं. सदर मयत तरुणीला याच परिसरात राहणारे सात तरुण व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते.
ADVERTISEMENT
धक्कादायक बाब म्हणजे या सात विकृत नराधमांना एक तरुणी हे कृत्य करण्यासाठी मदत करत होती. ही तरुणी पीडित तरुणीची मैत्रीण आहे. पोलिसांनी या प्रकणात आठ जणांना अटक केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
सनी पांडे, विजय यादव, प्रमेय तिवारी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा, काजल जयस्वाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. यामधील कृष्णा जयस्वाल व काजल जयस्वाल हे भाऊ बहिण आहेत. दरम्यान अटक आरोपीमधील काही कल्याणमधील बिल्डरची मुलं असल्याची माहिती समोर आली आहे.
‘आमच्या जिवाला धोका’; कुटुंबियांनी केली संरक्षण देण्याची मागणी
पीडितेच्या कुटुंबियांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर जिवाला धोका असल्याचंही म्हटलंय. “आमच्या मुलीवर बलात्कार झालाय. तिला ढकललं की तिने आत्महत्या केली याचा तपास पोलिसांनी करावा. तिला ब्लॅकमेल केलं जात होतं. कल्याणमधील एका मोठ्या बिल्डरची मुलं यात सहभागी आहेत. आरोपींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. बिल्डरकडून आमच्यावर देखील दबाव आणला जात आहे. आमच्या जिवाला धोका असून, आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं”, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.
“माझ्या मुलीवर बलात्कार झाला आहे. साकेत ग्रुपच्या लोकांनी मिळून माझ्या मुलीवर बलात्कार केला आहे. तिचा छळ करण्यात आला. तिला छतावरून ढकलण्यात आलं. पोलिसांनी काही केलं नाही. पोलिसांनी आम्हाला सुरक्षा द्यावी, आमच्यावर दबाव टाकला जात आहे,” असा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे.
“माझ्या भाचीवर बलात्कार झाला आहे. दीड दोन वर्षांपासून तिला त्रास दिला जात होता. पोलिसांनी न्याय द्यावा. हे त्याच्या बिल्डिंगचे लोक आहेत. बाजूचे काही पैसेवाले लोक आहेत. मोठंमोठे लोक आहेत. यामध्ये सात ते आठ जण असून, पोलिसांनी रिमांड घेतल्यास आणखी लोक बाहेर येतील. मुलीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट आहे. मोबाईल पोलीस ठाण्यात जमा आहे. हे लोक माझ्यावर अत्याचार करायचे, माझे व्हिडीओ बनवून मला धंद्यावर बसवायचे, असं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे,” आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मामाने म्हटलं आहे.
याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT