Crime : डॉक्टर तरूणीच्या बलात्कार हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोस्टमार्टम रिपोर्टने पोलिसांना फोडला घाम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Kolkata Doctor Rape And Murder Case
डॉक्टर तरुणीवर सामुहिक बलात्कार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निवासी डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळं देशभरात संतापाची लाट

point

डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून देशभरात संपाचं हत्यार उपसण्यात आलं

point

डॉक्टर तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याचा दावा

Kolkata Doctor Murder Case Latest Update: कोलकातामधील आर.जी.कार वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा,या मागणीसाठी डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून देशभरात संपाचं हत्यार उपसण्यात आलंय. निवासी डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळं देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाकडे सुपूर्द केला आहे. अशातच अखिल भारतीय सरकारी डॉक्टर संघटनेच्या अतिरिक्त महासचिव डॉ.सुवर्ण गोस्वामी यांनी शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा केला आहे. पीडित तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याचा दावा डॉ.गोस्वामी यांनी शवविच्छेदन अहवालाच्या माध्यमातून केला आहे. पीडित तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून १५१ ग्रॅम लिक्विड मिळालं आहे. या बलात्कार आणि हत्या प्रकरणात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असू शकतो,असंही गोस्वामी यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात अनेकांचा सहभाग?

डॉक्टर गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार,या बलात्कार आणि हत्येच्या गंभीर गुन्ह्यात अनेक लोकांचा हात असण्याची शक्यता आहे. तरुणीच्या शरीरावर गंभीर जखमा आहेत. क्रुरपणे तिच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हे कुणा एका व्यक्तीचं काम नसू शकतं. तसच गोस्वामी यांनी कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीचंही खंडन या केलं आहे. या प्रकरणात एका आरोपीचा समावेश असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीपासूनच संशयास्पद राहिला आहे.ही गंभीर घटना घडल्यानंतरही सेमिनार हॉलला खुलं ठेवण्यात आलं,असा आरोप डॉक्टरांनी केला आहे.त्या हॉलचं दुरुस्तीचं काम करायचं होतं,असंही म्हटलं जातंय.परंतु,सेमिनार हॉलच्या शेजारील रुममध्ये दुरुस्तीचं काम करायचं होतं. सेमिनार हॉलच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता, असा आरोप संप करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे.

हे ही वाचा >>Sanjay Raut: "महाराष्ट्रात सावत्र कुणीच नाही, दिल्लीत मोदी-शाह...", संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

सेमिनार हॉल सील का केला नाही?

संपावर असलेल्या डॉक्टरांनी दिलेली माहिती अशी की, पुरावे नष्ट करण्यासाठी सेमिनार हॉलच्या शेजारी बांधकाम सुरु करण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या ज्या सेमिनार हॉलमध्ये ही गंभीर घटना घडली, ते ठिकाण सील करायला हवं होतं. पंरतु, सेमिनार हॉलला सील का केलं नाही? असा सवाल कोलकाताच्या आर जी कर मेडिकल रुग्णालयातील डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Team India Home Schedule Revised: टीम इंडियाच्या वेळापत्रकात मोठा बदल, नेमकं काय घडलं?

...अन् या प्रकरणात संशयाची सुई फिरली

द लल्लनटॉपने पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी पीडित तरुणीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनं म्हटलं की, त्या दिवशी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास पीडितेची आई ओरडत माझ्याकडे आली. सर्वकाही संपलं आहे, असं ती म्हणत होती. नक्की काय झालं आहे, याबाबत मी तिला विचारलं. माझ्या मुलीनं आत्महत्या केली आहे, अशी माहिती रुग्णालयातून समोर आली आहे, असं पीडितेच्या आईने सांगितलं. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांसोबत मी रुग्णालयात पोहचले. मुलीला पाहण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी विनंती केली. परंतु, त्यांनी मुलीला दाखवलं नाही. तीन तासांनंतर पीडितेच्या कुटुंबियांना सेमिनार हॉलमध्ये नेलं. त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी मोबाईल मध्ये फोटो काढला आणि मला दाखवला. पीडित तरुणीवर गंभीरपणे अत्याचार केलं असल्याचं समोर आलं आणि या प्रकरणात संशयाची सुई फिरकू लागली.

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT