बुधवार पेठेत वेश्यव्यवसाय करणाऱ्या महिलेचा रिक्षा चालकाकडून खून, नेमकं घडलं तरी काय?
Pune Crime : पुण्यातील एका रिक्षाचालकाने महिला व्येश्येचा गळा दाबत तिचा खून केला आहे. ही घटना धायरीतील माळा परिसरात घडली. या प्रकरणी नांदेड शहर पोलिसांनी रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुणे शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ

रिक्षाचालकाने व्येश्यव्यवसाय करणाऱ्या महिलेला संपवलं
Pune Crime : पुणे शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याची अनेक कारणं आता समोर येऊ लागली आहेत. यामुळे पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडे बोट केलं जात आहे. अशातच आता पुण्यातील एका रिक्षाचालकाने महिला व्येश्येचा गळा दाबत तिचा खून केला आहे. ही घटना धायरीतील माळा परिसरात घडली. या प्रकरणी नांदेड शहर पोलिसांनी रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हेही वाचा : घरात वाद झाला आणि मुलाने थेट आईलाच भोसकलं... नागपूरमधील चीड आणणारी घटना
खून करण्यात आलेल्या महिलेचे श्यामली कमलेश सरकार असे असून वय वर्षे 40 राहणार रायकर माळा, धायरी. तर खून करणाऱ्याचे नाव नितीन चंद्रकांत पंडित वय वर्षे 51 राहणार धायरी असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आता पोलीस अधीकारी नितीन तनपुरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामली सरकार आणि आरोपी नितीन पंडित एकमेकांच्या परिचयाचे होते. श्यामली ही पुण्यातील बुधवार पेठेत वेश्यव्यवसाय करायची. रिक्षाचालक पंडित तिला दररोज रिक्षातून सोडायचा. रिक्षा चालक पंडितने तिला 40 ते 50 हजार रुपये उधार दिले होते.
त्यानंतर पंडितने तिला पैशांची मागणी केली असता, तिने पैसे परत करण्यास नकार दिला. यामुळे दोघांमध्ये वादंग निर्माण झाला. बुधवारी 4 जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पंडित तिला घेण्यासाठी धायरीतील रायकर माला परिसरात आला. तो श्यामलीच्या फ्लॅटवर गेला तेव्हा त्यांच्यात वाद होऊन कपड्याने श्यामलीचा गळा दाबत तिचा खून केला.
हेही वाचा : त्रिग्रही योग 2025 : 15 जूननंतर त्रिग्रही योग होणार सुरू, 'या' राशीचे लोक खोऱ्याने ओढणार पैसा
दरम्यान, या घटनेनंतर पंडित पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने श्यामलीची हत्या केल्याचा कबुलीनामा दिला. त्यानंतर शुक्रवारी 6 जून रोजी पंडितला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पंडितला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे नांदेड पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.