टोल कर्मचाऱ्याला चिरडून ट्रक चालक पळाला... विसापूर टोल नाक्यावरचा धडकी भरवणारा CCTV व्हिडीओ

मुंबई तक

या घटनेची माहिती मिळताच बल्लारपुर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात गाडीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मिनी ट्रकने टोल कर्मचाऱ्याला चिरडलं

point

विसापूर टोल नाक्यावरचा धडकी भरवणारा व्हिडीओ

point

टोल कर्मचाऱ्यासोबत काय घडलं?

चंद्रपुर : बल्लारशाह ते चंद्रपुर मार्गावरील विसापुर टोलनाक्यावर काल मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. या घटनेत टोल कर्मचारी संजय अरुण वांढरे (वय 27) गंभीर जखमी झाले. टोल टाळण्याच्या हेतूने चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न करताना चालकाने थेट कर्मचाऱ्याला चिरडलं. या घटनेत संजय वांढरे यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा >> मिठी नदी सफाई घोटाळ्याप्रकरणी डिनो मोरियाला समन्स, प्रकरण काय? अभिनेता कसा अडकला?

रात्री 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. संजय अरुण वांढरे हे विसापुर टोलनाक्यावर संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. रात्रीच्या वेळी बल्लारशाहकडून चंद्रपुरच्या दिशेने येणारी एक टाटा एस गाडी टोल टाळण्यासाठी चुकीच्या लेनमधून वेगाने येत होती. टोल कर्मचारी संजय यांनी गाडीला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत गाडी थांबवली नाही. चालकाने थेट संजय यांच्यावर गाडी चढवली. यामुळे संजय गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बल्लारपुर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात गाडीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, गाडीचा क्रमांक आणि चालकाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

हे ही वाचा >> बुधवार पेठेत वेश्यव्यवसाय करणाऱ्या महिलेचा रिक्षा चालकाकडून खून, नेमकं घडलं तरी काय?

बल्लारपुर पोलिसांनी सांगितलं की, “आम्ही या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करत आहोत. आरोपी चालकाला लवकरच अटक केली जाईल.”

हे वाचलं का?

    follow whatsapp