राजा-सोनम हनिमून केस : गाईडने सांगितली थरारक घटनेची A टू Z माहिती, पोलिसांनीच...

मुंबई तक

Raja-Sonam Honeymoon Latest Update :  इंदौरहून शिलाँगला हनिमूनसाठी फिरायला गेलेलं नवविवाहित कपल राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी केसमध्ये आता नवीन अपडेट समोर आली आहे

ADVERTISEMENT

Raja-Sonam Honeymoon Case latest Update
Raja-Sonam Honeymoon Case latest Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राजा-सोनम हनिमून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर

point

गाईडने केला अत्यंत महत्त्वाचा खुलासा

point

पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

Raja-Sonam Honeymoon Latest Update :  इंदौरहून शिलाँगला हनिमूनसाठी फिरायला गेलेलं नवविवाहित कपल राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी केसमध्ये आता नवीन अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी एका नव्या गाईडकडे चौकशी सुरु केली आहे. त्याने दावा केला आहे की, हे कपल एकटं नाही, तर अन्य 2-3 लोकांसोबत फिरायला गेलं होतं. त्यामुळे या प्रकरणाला वेगळच वळण लागण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत कुटुंबियांना वेगळीच माहिती दिली जात होती. दरम्यान, मृत राजाचा भाऊ विपिन रघुवंशीने यावर प्रश्न उपस्थित केला आहे. जर हा गाईडही त्यांच्यासोबत होता, मग पोलिसांनी त्याला समोर का आणलं नाही?

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

विपिन रघुवंशीने शिलाँग पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, पोलीस खूप धीम्या गतीने तपास करत आहेत. अनेक महत्त्वाचे पुरावे हातातून जाऊ शकतात. 

हॉटेलच्या सीसीटीव्हीत दिसले 3 संशयित लोक

हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयीत लोक दिसले आहेत. या लोकांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी हॉटेलचं डीवीआर जप्त केलं आहे. पण पोलिसांच्या धीम्या तपासामुळे पुरावे नष्ट होऊ शकतात.

हे ही वाचा >> जंगलात हनिमूनसाठी गेले, पण नवविवाहित जोडप्यासोबत घडलं सर्वात भयंकर! पोलिसांनाही बसलाय हादरा..

पोस्टमार्ट रिपोर्ट अजूनही दिला नाही..

राजाच्या कुटुंबियांनी शिलाँग प्रशासनाकडे पोस्ट मार्टम रिपोर्टची मागणी केली आहे. परंतु, आतापर्यंत रिपोर्ट देण्यात आला नाही. यामुळे या प्रकरणाती महत्त्वाचे पुरावे नष्ट होऊ शकतात, अशी भीती कुटुंबियांना आहे. दरम्यान, पीडित कुटुंबियांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. राजाची हत्या कोणी केली? याचा शोध लावण्यासाठी ही मागणी केली जात आहे. सोनम कुठे गायब झाली आहे? पोलिसांकडून अन्य गाईड आणि संशयितांकडे चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा >> आरारारारा! पती गर्लफ्रेंडसोबत पळून जात होता..बायकोनं टोल प्लाझावर कार अडवली अन् घडलं भयंकर!

त्या CCTV मध्ये काय सापडलं होतं?

राजा आणि सोनम दोघेही स्कूटरवर बसून येतात. दोघांनीही हेल्मेट घातलं आहे. दोघेही लॉबी बॅग घेऊन त्याठिकाणी येतात. बाहेर स्कुटीवर बसल्यावर हॉटेल कर्मचाऱ्यासोबत चर्चा करतात. त्यानंतर स्कुटीच्या डिक्कीत सफेद रंगाची ट्रॉली बॅग ठेवण्याचा प्रयत्न करतात. ट्रॉफी बॅग डिक्कीत बसत नसल्याने त्यात असलेले कपडे डिक्कीत ठेवतात. सोनम तिचं रेनकोटही डिक्कीत ठेवते. दोघेही ट्रॉली घेऊन हॉटेलजवळ जातात.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp