"लय घाण बोलेन...", म्हणत कानाखाली मारली, महिला पोलिसाची ट्रिपल सिट स्कुटी पळवणाऱ्या मुलींना शिवीगाळ

मुंबई तक

ही घटना लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर घडली. तीन तरुणी स्कुटीवर ट्रिपल सीट बसून भरधाव वेगानं जात होत्या. महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलने त्यांना थांबवलं आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांना मारहाण केली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लातूरमध्ये महिला पोलिसाची मुलींना शिवीगाळ

point

ट्रिपल सिट बसून वेगाने गाडी चालवल्याचा आरोप

point

महिला पोलिसानं अश्लील भाषेत मुलींना 'समजावलं'

लातूर : लातूर शहरातील रेनापुर नाका परिसरात एका महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलने ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या तीन तरुणींना रस्त्यावर थांबवून मारहाण केली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अश्लील शब्दात शिवीगाळ...

ही घटना लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर घडली. तीन तरुणी स्कुटीवर ट्रिपल सीट बसून भरधाव वेगानं जात होत्या. महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलने त्यांना थांबवलं आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांना मारहाण केली. व्हिडीओमध्ये कॉन्स्टेबल तरुणींना, "एकतर तिघी बसून चालल्यात, त्यात मागच्या दोघी वाकड्या बसल्या, रेस गाडी चालण्याचे लायसन्स मिळालं का? पायतन काढून हानीन तिघींना पण... मी लय घाण बोलेन, पटकन बापाला फोन लावा..." अशा खालच्या स्तरावरील भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहे. कॉन्स्टेबलने असे अनेक शब्द वापरले, त्याचा उल्लेखही बातमी करता येत नाही. 

हे ही वाचा >> पोलीस सांगून गाडीत बसवत अपहरण, चाकू लावून 50 लाखांची बॅग घेतली आणि फेकून दिलं... हादरवून टाकणारी घटना

दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडीओ जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. तो सोशल मीडियावर शेअर केला, त्यानंतर तो वेगानं व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये तरुणी कॉन्स्टेबलची माफी मागताना दिसतेय, पण कॉन्स्टेबलचा राग काही शांत झाला नाही.

मलाही तुमच्यासारख्या मुली...

राग व्यक्त करत असताना, "मलाही तुमच्यासारख्याच मुली आहे" म्हणत महिला पोलिसाने या मुलींना दटावलं.  या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकऱ्यांनी तरुणींनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कठोर कारवाईचे समर्थन केलं आहे, तर काहींनी महिला कॉन्स्टेबलच्या आक्षेपार्ह वर्तनावर आणि शिवीगाळीवर टीका केली आहे. कॉन्स्टेबलने रस्त्यावर तरुणींना मारहाण करणे आणि अपमानास्पद भाषा वापरणे चुकीचे असल्याचे अनेकांचे मत आहे.

हे ही वाचा >> पती घरी नसताना महिला शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत करायची सेक्स! हॉटेलमध्येही घेऊन जायची..'तो' Video व्हायरल!

या घटनेने वाहतूक नियमांचे पालन, पोलिसांचे वर्तन आणि सोशल मीडियावरील जनमत या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. संबंधित महिला कॉन्स्टेबलवर कारवाई होणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिस प्रशासन याप्रकरणी चौकशी करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp