Crime : मुलीला पाण्याच्या टाकीवर नेऊन गँगरेप, काँग्रेस आमदाराच्या…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

madhya pradesh crime 17 year old girl gang rape and beaten gwalher madhya pradesh crime
madhya pradesh crime 17 year old girl gang rape and beaten gwalher madhya pradesh crime
social share
google news

Minor Girl Gangrape in Madhy pradesh : देशात बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पाण्याच्या टाकीवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape)  केल्याची घटना घडली आहे. या घटनेने आता शहर हादरले आहे. या घटनेची पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन चार आरोपींना अटक केली आहे. या चार आरोपींपैकी दोन आरोपी हे काँग्रेसचे आमदाराचे (Congress Mla) नातेवाईक असल्याची माहिती आहे. या घटनेवरून आता संताप व्यक्त होत आहे. (madhya pradesh crime 17 year old girl gang rape and beaten gwalher madhya pradesh crime)

मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अॅडिशनल एसपी निरंजन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनूसार, मोतीझील परिसरात राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची वर्षभरापूर्वीच सोशल मीडियावर सरविंद कुशवाहसोबत मैत्री झाली होती. या मैत्रीनंतर सरविंद कुशवाहने त्याच्या चार साथीदारासह 21 नोव्हेंबरला अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. या अपहरणानंतर तिला जुन्या छावणीच्या मोतीझील येथील पाण्याच्या टाकीवर नेण्यात आले. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या बलात्कारानंतर तिला बेदम मारहाण करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हे ही वाचा : Chhagan Bhujbal : शिंदेंच्या मंत्र्याने भुजबळांना सुनावलं; म्हणाले, “कुणबी प्रमाणपत्र रद्द…”

या संपूर्ण घटनेनंतर अल्पवयीन पीडितेने पोलिसात दाखल होऊन अपहरण आणि बलात्काराची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर छावणी ठाणे पोलिसांनी सरविंद कुशवाह, रामू कुशवाह, छोटे खान आणि एका अज्ञात आरोपीसह चौघांवर 363, 366, 376, 377,323,294,506, 34 आणि एससी एसटी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या आरोपींपैकी दोन सरविंद कुशवाह आणि रामू कुशवाह हे सुमावली विधानसभेतील काँग्रेस आमदार अजब सिंह कुशवाह यांचे नातेवाईक असल्याचेही सांगण्यात येत आहे. अतिरिक्त एसपी निरंजन शर्मा यांनीही आरोपी काँग्रेस आमदाराचे नातेवाईक असल्याचे मान्य केले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे ही वाचा : Crime : संध्याकाळी मित्रांसोबत केक कापला, सकाळी सापडला मृतदेह; तरूणासोबत बर्थडे पार्टीत…

तरुणीने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली आहे. तिच्या सोशल मीडियावरील मित्राने चार जणांसह तिला मोतीझिल पाण्याच्या टाकीजवळ नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसेच मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, असे एएसपी निरंजन शर्मा यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT