‘एका बॅगेत मुंडकं, दुसऱ्या बॅगेत…’अल्पवयीन बायकोचे नवऱ्याने केले तुकडे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Man kills minor wife
Man kills minor wife
social share
google news

Man kills minor wife : देशात काही महिन्यापुर्वीच श्रद्धा वालकर हत्याकांड घडलं होते. या हत्याकांडात बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडची तुकड़े तुकडे करून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता.आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पतीने आपल्याच अल्पवयीन बायकोची तुकडे तुकडे करून निघृण हत्या केल्याची घटना घडली. या हत्येनंतर आरोपी पतीने बायकोचे धड एका सुटकेसमध्ये तर शरीराचे इतर तुकडे दुसऱ्या सुटकेसमध्ये ठेवून, बॅगा जंगलात सोडून पळ काढला होता. या प्रकरणात कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर 4 तासात आरोपी पतीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. (man kills minor wife shocking crime story from tripura)

ADVERTISEMENT

घटनाक्रम काय?

त्रिपुरातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 15 वर्षीय तनुजा बेगमची हत्या करण्यात आली होती. तनुजाचा लहान भाऊ बापन मियाने दिलेल्या माहितीनुसार, आठ महिन्यापुर्वीच तनुजा बेगमचं लग्न कायम मियाशी झाले होते. दोघांचे लग्न थाटामाटात पार पड़ले होते. दोघांचा सुखी संसार सुरु होता. मात्र शुक्रवारी अचानक तनुजाचा आईला तिची मुलगी गायब झाल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच तनुजाच्या आईने मुस्लिमपुरा भागातील तिचे सासरचे घर गाठलं.

हे ही वाचा : फॅशन डिझायनर तरूणीची आत्महत्या, पण शेवटचा व्हि़डिओ का होतोय व्हायरल?

तनुजाचा खुप शोध घेतल्यानंतरही ती सापडली नसल्याने कुटूंबियांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तनुजाचा शोध घ्यायला सुरूवात केली होती. यावेळी तासाभराच्या तपासात पोलिसांना तनुजाचा मृतदेह दोन बॅगेत सापडला होता. दरम्यान तनुजाच्या आईला तिच्या घरात रक्ताचे निशाण सापडले होते. त्यामुळे तिचा खुन पती कायमनेच केल्याचा संशय बळावला होता. कारण या घटनेनंतर तो फरार झाला होता. एसडीपीओ आशीष दासगुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या टीमने कायम मियाचा तपास सुरू केला होता.यावेळी तासभर शोध घेतल्यानंतर पोलिसांना ताब्यात आरोपी होता.

हे वाचलं का?

पश्चिम जिल्ह्याचे एसपी रमेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायम मियाला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने हत्येची कबूली दिली. तनुजाची हत्या करून जंगलात दोन बॅगमध्ये तिचे मृतदेह ठेवला होता. पोलिसांनी जंगलातून या दोन्ही बॅगा ताब्यात घेतल्या. या घटनेची माहिती मिळाच्या 4 तासात आरोपीला अटक केली आहे. आता या प्रकरणात आणखीण कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास सूरू आहे.

हे ही वाचा : सुनेचे दोन तरुणांसोबत सुरु होते शरीरसंबंध, सासूने दरवाजाला लावला टाळा अन्…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT