Mira Road: ‘मी नपुंसक आहे, आणि…’, सरस्वती वैद्यची हत्या करणारा मनोज साने असं का म्हणाला?
लिव्ह-इन पार्टनर सरस्वतीची हत्या करणारा मनोज साने याने पोलिसांना दिलेल्या जबाबात असं म्हटलं आहे की, तो नपुसंक आहे आणि त्याने सरस्वतीशी कधीही लैंगिक संबंध ठेवले नव्हते.
ADVERTISEMENT
मुंबई: मीरा रोड येथे राहणाऱ्या लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्यची हत्या (Mira Road Murder) करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या मनोज सानेबाबत (Manoj Sane) आतापर्यंत अनेक खळबळजनक खुलासे झाले आहेत. आता पोलिसांच्या तपासात मनोजला सेक्सची चटक असल्याचे समोर आले आहे. तो अनेक डेटिंग अॅपवर (Dating app) मुलींच्या संपर्कात असल्याचंही समोर आलं आहे. याच मुद्द्यावरुन सरस्वती आणि मनोजचं भांडण व्हायचं आणि याच भांडणातून मनोजने सरस्वतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. असं असताना आता मारेकरी मनोजने पोलिसांना आपल्या जबाबात सांगितलं की, त्याला एचआयव्हीची बाधा (HIV Positive) झाली असून, तो नपुंसक आहे. त्यामुळे आता पोलीस त्याच्या या दाव्याची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करणार आहेत. (mira road murder case manoj sane who killed live in partner saraswati vaidya impotent hiv positive)
ADVERTISEMENT
प्राथमिक तपासाच्या आधारे, डेटिंग अॅप्सवरून झालेल्या भांडणातून सरस्वतीची हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. आरोपी अश्लील वेबसाईटवर सक्रिय असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या माध्यमातून तो अनेक मुलींच्या संपर्कात होता. त्याच्या मोबाइलमध्ये अनेक अश्लील फोटोही सापडले आहेत.
मनोज सानेने दावा केला आहे की, सरस्वतीने आत्महत्या केली आहे. मात्र, पोलीस हे मानायला तयार नाहीत. मीरा-भाईंदर झोनचे डीसीपी जयंत भजबळे सांगतात की, मनोजनेच हत्या केली आहे. त्याने ही हत्या कशी घडवली, याचा तपास सध्या सुरू आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> मनोज सानेला होती सेक्सची चटक, म्हणून सरस्वतीला… फोनमध्ये सापडले पॉर्न Video
दरम्यान, मनोज साने हा अतिशय चाणाक्ष आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या खुनाच्या प्रकरणातून पळवाटा काढण्यासाठी तो नपुंसक असल्याचा दावा करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
पोलिसांनी फ्लॅटमधून कीटकनाशकही केले जप्त
आतापर्यंतच्या तपासात सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सानेने इलेक्ट्रिक करवत आणि चाकूचा वापर केल्याचे समोर आले आहे. मृतदेहाचे तुकडे करताना करवतीची साखळी तुटली त्यामुळे त्याने करवत दुरुस्त करून आणल्याचंही समोर आलं आहे. पोलिसांनी त्याच्या फ्लॅटमधून कीटकनाशकही जप्त केली आहेत. आता सरस्वतीचा मृत्यू कीटकनाशकांच्या सेवनामुळे झाला का? याचीही माहिती पोलीस गोळा करत आहेत.
ADVERTISEMENT
‘सरस्वती दिवसभर फ्लॅटमध्येच राहायची’
मनोज सानेशिवाय सरस्वती फारसं कुणी ओळखत नव्हती आणि ती देखील कुणाला ओळखत नव्हती. कारण ती दिवसभर फ्लॅटमध्येच राहायची. सानेने त्याच्या बहिणीलाही सरस्वतीशी संपर्क करू दिला नव्हता. हे दोघे (सरस्वती आणि मनोज) मीरा रोड पूर्व येथील गीता आकाशदीप इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेल्या तीन वर्षांपासून राहत होते.
ADVERTISEMENT
‘मनोज काळी सॅक घेऊन फ्लॅटबाहेर पडला, अन्…’
पोलिसांचे म्हणणे आहे की, शेजाऱ्यांनी सांगितले की, मनोज साने त्याच्या फ्लॅटमधून काळ्या रंगाची सॅक घेऊन बाहेर आला आणि त्याने लोकांना सांगितले की तो रात्री 10.30 पर्यंत परत येईल. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस मनोजच्या फ्लॅटवर पोहोचले आणि दरवाजा ठोठावला. बराच वेळ आतून काहीच उत्तर न आल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला.
हे ही वाचा >> Mumbai Weather: बिपरजॉयमुळे मुंबईचा समुद्र खवळला, ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा
येथून पोलिसांना प्लास्टिकची पिशवी आणि रक्ताने माखलेली करवत सापडली. यावेळी पोलिसांना किचनमध्ये प्रेशर कुकर आणि काही भांड्यांमध्ये मानवी मांस उकडलेले आढळले. तसेच महिलेचे केस जमिनीवर पडलेले आढळले. याशिवाय अर्धी जळालेली हाडे आणि मांस सिंक, बादल्या आणि टबमध्ये आढळून आले.
विशेष म्हणजे लोकांच्या तक्रारीवरून 7 जून रोजी पोलिसांचे पथक मुंबईतील मीरा रोडवरील गीता आकाश दीप सोसायटीत पोहोचले होते. येथे सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पाऊल ठेवताच पोलिसांना धक्का बसला होता. पोलिसांना तीन बादल्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडलेले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT