मॉडेल दिव्याच्या हत्येची ‘ती’ शेवटची रात्र, पोलिसांनी सगळा घटनाक्रमच दाखवला

ADVERTISEMENT

model Divya Pahuja murder her body was taken away bmw car and disposed
model Divya Pahuja murder her body was taken away bmw car and disposed
social share
google news

Model Divya Pahuja Murder Case: गुरुग्राममधील ज्या हॉटेलमध्ये मॉडेल दिव्या पाहुजाची (Model Divya Pahuja) हत्या करण्यात आली होती. त्याबद्दल आता पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. तपासावेळी पोलिसांनी सांगितले की, हॉटेलच्या त्या खोली नंबर 111 मध्ये तिच्या आधीच अभिजित सिंह (Abhijit Singh) ओळखीच्या माणसाबरोबर पोहचला होता. मात्र त्याचवेळी दिव्याही तिथे उपस्थित होती. त्याच खोलीत नंतर अभिजित आणि दिव्याचा वाद झाला. त्यावादातूनच नंतर हॉटेल मालक अभिजितने दिव्यावर गोळी झाडली आणि तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृतदेह BMW मध्ये कोंबला

दिव्या पाहुजाच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जो काय प्रकार घडला, ती सगळी घटना आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली आहे. त्या सीसीटीव्हीमुळेच हा सगळा प्रकार आता समोर आला. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये अभिजित आणि त्याच्या सोबत असलेल्या मित्रानी दिव्याचा मृतदेह बीएमडब्लूमध्ये घालून तिथून ते पळून गेले होते.

हे ही वाचा >> हाजी मलंग दर्गा की मंदिर?, राजकारण का तापले? नेमका त्याचा इतिहास काय?

विल्हेवाटसाठी दिले 10 लाख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजितने केलेला गुन्हा मान्य केला असून त्याने सांगितले की, दोन गुंडाच्या मदतीने दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यासाठी त्याने त्या दोघांना 10 लाख रुपये दिल्याचेही त्याने कबूल केले आहे. त्यानंतर दिव्याची हत्या करण्यासाठी तीन लोकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.  त्यांना पोलिसांना ताब्यातही घेतले आहे. मात्र अजूनही दिव्याचा मृतदेह मिळाला नाही, आणि त्यासाठी वापरण्यात आलेली कारही सापडली नाही. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितले की, ती जिवंत असतानाचा एक शेवटचा तिचा फोटो फक्त मिळाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दिव्या पाहुजा नेमकी कोण?

दिव्याच्या हत्या प्रकरणातील अभिजित हा हॉटेल मालक आहे. मात्र त्याला मदत करणारे प्रकाश आणि इंद्रजित हे दोघंही हॉटेलमध्ये काम करत होते. त्या दोघांनीच दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्या दोघांनीच अभिजितला मदत केली होती. त्यांच्यामुळेच खरं तर हा तपास अधिक गुंतागुंतीचा झाला होता.  मुंबईतील एका हॉटेलमध्ये हरियाणातील गॅंगस्टर संदीप गाडोलीच्या एन्काऊंटर झाल्यानंतर मॉडेल दिव्या पाहुजा सात वर्षे तुरुंगात होती. त्यानंतर काही महिन्यापूर्वीच तिला जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये तिची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी तिची हत्या झाल्याचे जाहीर केले.

…म्हणून झाली हत्या

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी रात्री 27 वर्षाच्या दिव्या पाहुजाची एका हॉटेलच्या खोलीत गोळी मारुन तिच्या हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, दिव्याजवळ हॉटेल मालक अभिजितचे काही आक्षेपार्ह फोटो होते. त्या फोटोवरूनच ती त्याला ब्लॅकमेल करत होती आणि पैसा मागत होती. मात्र आता अभिजितने केलेले हे आरोप तिच्या कुटुंबीयांनी फेटाळून लावले आहेत. मात्र या प्रकरणी आता तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Jitendra Awhad : रोहित पवारांचा आव्हाडांना डोस; म्हणाले, “नको त्या…”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT