Navi Mumbai : घरात एकटी असल्याचे पाहून डाव साधला, सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार
पीडीत तरूणी ही 18 वर्षाची आहे. घटनेच्या दिवशी पीडीत तरूणी घरात एकटीच झोपली होती. याच संधीचा फायदा घेऊन तिच्या सावत्र बापाने तिच्यावर बलात्कार केला होता.
ADVERTISEMENT
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 18 वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. हा बलात्कार तिच्याच 28 वर्षीय सावत्र बापाने केला आहे. या प्रकरणी आता मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन सावत्र बापाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी नराधम बापाचा शोध सूरू केला आहे. या घटनेने नवी मुंबईत खळबळ माजली आहे. (navi mumbai crime news man raping her teen step daughter crime story navi mumbai)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत तरूणी ही 18 वर्षाची आहे. घटनेच्या दिवशी पीडीत तरूणी घरात एकटीच झोपली होती. याच संधीचा फायदा घेऊन तिच्या सावत्र बापाने तिच्यावर बलात्कार केला होता. या बलात्काराच्या घटनेनंतर सावत्र बाप फरार झाला आहे. ही घटना 22 डिसेंबरला घडली आहे. या प्रकरणी आता पीडीत तरूणीने पोलीस ठाणे गाठून आरोपी सावत्र बापाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा : Sharad Pawar : “गौतम अदानींचं नाव घ्यावं लागेल, त्यांनी 25 कोटींचा चेक पाठवला”
न्युज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पीडीत 18 वर्षीय मुलीने पोलीस ठाणे गाठून तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच हा बलात्कार तिच्याच 28 वर्षीय सावत्र बापानेच केल्याचे देखील तिने म्हटले आहे. जेव्हा ती घरात एकटीच होती त्यावेळेस सावत्र बापाने डाव साधत तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी पीडितेची तक्रार लिहून घेत पुढील तपास सुरु केला आहे.
हे वाचलं का?
पीडीतेच्या बलात्काराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिला मेडिकलसाठी पाठवले आहे. तसेच मेडिकल रिपोर्टमध्ये बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. अद्याप या प्रकरणातील सावत्र बापाला अटक झाली नाही आहे.पोलीस आरोपीच्या मागावर असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
हे ही वाचा : Maratha Reservation : क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्विकारली! CM शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन, ‘वकिलांची फौज…’
दरम्यान नुकतीच ठाणे जिल्ह्यातील एका 44 वर्षीय व्यक्तीला आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत खटल्यांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी या आदेशात दोषीला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT