मामाची भाचीवर वाईट नजर पडली आणि…संपूर्ण गावं हादरलं
Rape Case : नवी मुंबईत स्वतःच्या अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांना सांगितले की, नवी मुंबई (New Mumbai) परिसरातील एका व्यक्तीने आपल्या 15 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केला असून नंतर ती अल्पवयीन मुलगी (Minor Girl) गरोदर (Pregnant) राहिली आहे. या प्रकरणी आता पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला असून […]
ADVERTISEMENT

Rape Case : नवी मुंबईत स्वतःच्या अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांना सांगितले की, नवी मुंबई (New Mumbai) परिसरातील एका व्यक्तीने आपल्या 15 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केला असून नंतर ती अल्पवयीन मुलगी (Minor Girl) गरोदर (Pregnant) राहिली आहे. या प्रकरणी आता पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीलाही ताब्यात घेण्यत आले.
भाचीवरच अत्याचार
या प्रकरणातील आरोपी हा नेरुळचा रहिवासी असून पीडित मुलगी ही त्याची भाची लागते. आरोपीने आपल्या भाचीला घरी बोलवून 4 ऑक्टोबर 2023 रोजी तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर आरोपीनं तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
हे ही वाचा >> गुंड असिफ दाढी-अजित पवारांच्या भेटीला, ‘त्या’ फोटोमुळे राजकारणात खळबळ
धक्कादायक प्रकार
त्यानंतर काही दिवसांनी ती आजारी पडल्याने तिला गोवंडी परिसरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या वेगवेगळ्या तपासण्याही केल्या. तिच्या तपासण्या झाल्यानंतर मात्र ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी मुलीच्या नातेवाईकांना सांगितले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीच्या वेगवेगळ्या टेस्ट झाल्यानंतर मात्र डॉक्टरांनी या घटनेची माहिती नेरुळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनीही मुलीकडे चौकशी करत तिच्या मामाला अटक केली.या प्रकरणी आता पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.