सातारा : भूत काढण्याच्या बहाण्याने शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, भोंदूबाबा गजाआड

इम्तियाज मुजावर

फलटणमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर भूत काढण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी आरोपी भोंदूला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Satara Crime
Satara Crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भूत काढण्याच्या बहाण्याने शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

point

भोंजूबाबा गजाआड

Satara Crime : सातारा जिल्ह्यातील फलटणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अंगात भूत शिरल्याची बतावणी करत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भोंदूगिरी आणि जादूटोण्याचा आधार घेऊन अल्पवयीन मुलीचे शोषण करणाऱ्या सौरभ नाना मदने या संशयित आरोपीविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण फलटण शहर आणि परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

अंगातील भूत काढण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सौरभ मदने याने पीडित शाळकरी मुलीच्या अंगातील भूत काढण्याचा बहाणा केला होता. यासाठी त्याने बाहुली, लिंबू आणि चामडी गोफणीचा वापर करून अघोरी विधी केले. या अघोरी कृत्यांचा धाक दाखवून आणि भूत काढण्याच्या नावाने त्याने पीडितेला एका निर्जन स्थळी नेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार केले. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या पीडितेने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर हा संपूर्ण भीषण प्रकार समोर आला.

हे ही वाचा : MPSC आंदोलनाबाबत हायकोर्टातून मोठी अपडेट, न्यायालयाचं विद्यार्थ्यांना आवाहन, सरकारला निर्देश

सौरभ मदने गजाआड

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तत्काळ फलटण शहर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सौरभ मदने याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा तसेच महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपीला गजाआड केले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा : तपासणीच्या नावाखाली डॉक्टरचा महिलेच्या प्रायव्हेट पार्टला चुकीचा स्पर्श, पोलिसांकडून अटक

फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार खटला

या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जाईल. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस प्रशासन न्यायालयात भक्कम पुरावे सादर करून प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.