Solapur: महिला डॉक्टरची आत्महत्या, गळफास घेतला अन्... 'त्या' चिठ्ठीत नेमकं काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

solapur news women dr commit suicide write note to husband mohol police solapur news
सोलापूरात महिला डॉक्टराची आत्महत्या
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूरमध्ये डॉक्टर महिलेची आत्महत्या

point

डॉक्टर महिलेने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

point

डॉक्टर महिलेच्या आत्महत्येने सोलापूर हादरलं

Solapur Suicide Case : विजय बाबर, सोलापूर :  छत्रपती संभाजीनगरमध्ये चिठ्ठी लिहून महिलेने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरमध्ये (solapur) एका महिला डॉक्टरने (Doctor Suicide) आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रश्मी बिराजदार असे या डॉक्टर महिलेचे नाव आहे. रश्मी बिराजदार यांनी आत्महत्येपुर्वी एक चिठ्ठी लिहली आहे.मात्र चिठ्ठीतून देखील या आत्महत्येचा उलगडा होऊ शकला नाही आहे. (solapur news women dr commit suicide write note to husband mohol police solapur news) 

ADVERTISEMENT

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात डॉ. रश्मी बिराजदार यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पंख्याला साडीने गळफास घेऊन रश्मी बिराजदार यांनी आत्महत्या केली होती. या दरम्यान रश्मी यांचे पती संतोष बिराजदार हे स्वतःच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी गेले होते. या दरम्यान दुपारी त्यांना काम करणाऱ्या व्यक्तीने फोन करून ही घटना कळवली होती. यावेळी बेशुद्धावस्थेत डॉ.रश्मी बिराजदार यांना ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी  डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले होते. 

हे ही वाचा : Narayan Rane: 'म्हणून आदित्य ठाकरेला जाऊ दिलं', सिंधुदुर्गात काय घडलं ते राणेंनीच सांगितलं!

दरम्यान रश्मी बिराजदार यांनी आत्महत्या करण्यापुर्वी एक चिठ्ठी लिहली होती. या चिठ्ठीत त्यांनी ''मुलांना सांभाळा...मला माफ करा'' असा मजकूर लिहला आहे.यामध्ये त्यांनी त्यांच्या आत्महत्येमागचं काहीच कारण सांगितलं नाही आहे. याउलट आपल्या पतीकडे माफी मागितली आहे आणि मुलांना सांभाळण्याची विनंती केली आहे. त्यामुळे या चिठ्ठीतून रश्मी यांनी का आत्महत्या केली? याचे कारण समजू शकले नाही आहे. 

हे वाचलं का?

 डॉ. रश्मी बिराजदार बीएएमएसची पदवी प्राप्त डॉक्टर आहेत. त्या गेल्या दहा वर्षांपासून डॉ. रश्मी बिराजदार या रुग्णांची सेवा करत होत्या. सध्या त्या मोहोळ तालुक्यातील शहराच्या ठिकाणी नव्यानेच सुरु झालेल्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात काम करत होत्या. त्यांचे पती संतोष बिराजदार यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे. निवासस्थानाच्या इमारतीमध्येच हे रुग्णालय असल्याची माहिती आहे. येथे रश्मी बिराजदार त्यांच्या पती आणि दोन मुलांसोबत राहत होत्या. 
 
दरम्यान या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रश्मी यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप नेमकं कारण समजू शकलं नाही. पण या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांच्या खात्यात 3000 जमाच होणार नाही, सरकारने स्पष्टच सांगितलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT