बॉयफ्रेंड राज सोनमला सगळ्यांसमोर दीदी बोलायचा, पण नंतर भलतंच... राज कुशवाहच्या आईने उडवली खळबळ!

मुंबई तक

Raja Raghuwanshi Case : सोनमने आपल्या बॉयफ्रेंडला हाताशी घेऊन पतीला म्हणजेच निष्पाप राजा रघुवंशीला कटात अडकवून हत्या केली. या हत्येनंतर राज कुशवाहाच्या आईने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तो सोनमला दिदी म्हणायचा, असा दाव राज कुशवाहच्या आईने केला आहे.

ADVERTISEMENT

Raja Raghuwanshi Crime News
Raja Raghuwanshi Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राजा रघुवंशी प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा

point

राज कुशवाहच्या आईने केले मोठे खुलासे

Raja Raghuwanshi Case: मेघालयातील राजा रघुवंशीची हत्या करणाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी ऑपरेश हनीमूनअंतर्गत शोधमोहिम सुरु केली. यादरम्यान, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. यावेळी सोनमवर अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात सोनमने आपल्या बॉयफ्रेंडला हाताशी घेऊन पतीला म्हणजेच निष्पाप राजा रघुवंशीला कटात अडकवून त्याची हत्या केली.

हेही वाचा : आधी मिठी मारतो नंतर Kiss करतो.. सीरियल किसरचा धुमाकूळ, महिलांमध्ये प्रचंड भीती!

सोनम आणि तिचा बॉयफ्रेंड राजला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे असणारी हत्यारे पोलिसांनी जप्त केली. सोनम आणि राजच्या म्हणण्यानुसार, राजा रघुवंशीला ठार मारत त्याची हत्या करण्यात आली. याच घटनेवरुन मृत तरुण राजा रघुवंशीच्या आईने धक्कादायक खुलासे केले आहेत. 

राज कुशवाहच्या आईकडून धक्कादायक खुलासे

राज कुशवाहच्या आईने सांगितले की, राज हा सोनमला दिदी म्हणायचा. राजच्या आईने पुढं सांगितलं की, राजला सोनमचे फोन यायचे, पण त्यांच्या मुलाने कधीच याबाबत काहीही सांगितलं नाही. 

तपासादरम्यान सांगितले की, सोनमच्या कुटुंबियांना राज आणि सोनमच्या अफेयरची माहिती होती. सोनमने राजसोबतच्या लग्नाबाबत घरी सांगितलं होतं. पण सोनमच्या कुटुंबाने लग्नाला विरोध केला होता. राज हा सोनमच्या वडिलांच्या कंपनीत नोकरी करायचा. तसेच तो सोनमहून 5 वर्षाने लहान असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा : सोनमने मारेकऱ्यांना केला इशारा अन् त्या सेकंदभरात राजाचा खेळ खल्लास, घटनास्थळी...

अशातच सोनमने षडयंत्र रचत राजा रघुवंशीसोबत विवाह केला. राजाच्या लग्नानंतर सोनमला विधवा व्हायचं होतं. राजाच्या हत्येनंतर ती विधवा झाल्यास तिला राजसोबत लग्न करता येईल, या कारणाने तिने आणि तिच्या साथीदारांनी राजाला संपवलं. मात्र, तिला जे साध्य करायचं होतं ते साध्य करता आलं नाही, उलट सोनम आणि राज हे दोघेही अटकेत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp