सोनम अन् तिच्या बॉयफ्रेंडचा 'तो' फोटो व्हायरल! कुठे क्लिक केला...खळबळजनक माहिती आली समोर
Raja-Sonam Honeymoon Case : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह एकमेकांसोबत असल्याचा फोटो समोर आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर

सोनम-राजचा 'तो' फोटो होतोय व्हायरल

सोनमने पोलिसांसमोर दिली मोठी कबुली
Raja-Sonam Honeymoon Case : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह एकमेकांसोबत असल्याचा फोटो समोर आला आहे. या फोटोत सोनम आणि राज खूप खुश असल्याचं दिसत आहे. राज सोनमला दीदी म्हणायचा..असं त्यांच्या मित्रांकडून सांगण्यात आलंय. दरम्यान, दोघांचाही हा फोटो व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सोनम-राजचा 'तो' फोटो होतोय व्हायरल
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हा फोटो राजाच्या हत्येच्या घटनेपूर्वीचा आहे. सोनम आणि राजने हा फोटो इंदौरमध्येच काढल्याचं म्हटलं जात आहे. मेघालय पोलीस आणि इंदौर क्राईम ब्रान्चच्या तपासात समोर आलंय की, काही दिवसांपूर्वी सोनम आणि राजने इंदौरमध्ये एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये वेळ शेअर केला होता.
हे ही वाचा >> पत्नीचं छाटलेलं मुंडकं स्कूटरवर ठेवून करत बसला Ride, पतीला आला अनैतिक संबंधाचा संशय अन्...
सोनमने दिली मोठी कबुली
मेघालय पोलिसांनी याप्रकरणात मोठी अपडेट समोर आणली आहे. त्यांनी मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाहला समोरासमोर आणलं. पोलिसांकडे मोठे पुरावे होते, या दबावामुळे सोनमने अखेर सत्य कबुल केलं. शिलाँग पोलिसांनी सोनम आणि आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज दाखवला. तसच घटनास्थळी सापडलेला सोनमचा शर्टही दाखवला. त्यानंतर सोनमने कुबल केलं की, तिनेच पती राजाची हत्या केली.
सोनमचा भाऊ पोहोचला राजाच्या घरी, म्हणाला...
सोनम रघुवंशीचा भाऊ आज दुपारी गोविंद रघुवंशी यांच्या इंदौरच्या घरी पोहोचला. माध्यमांशी बोलताना गोविंदने स्पष्ट म्हटलं की, ज्याने कोणी हत्या केली आहे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सोनमने रचलेल्या हत्येच्या कटाबाबत कोणालाच काही माहित नवह्तं, असं गोविंदचं म्हणणं आहे. जर त्यांना असं माहित असतं, तर हत्या होऊ दिली नसती, असं त्यांचं म्हणणं आहे. गाजीपूरमध्ये सोनमसोबत फक्त दोन मिनिट चर्चा झाली होती, त्यावेळी सोनमने गुन्ह्याची कबुली दिली नव्हती, असंही त्याने म्हटलं आहे.
हे ही वाचा >> भाऊजीला पाय तुटेपर्यंत मारलं...पत्नीला कंटाळल्यानं वेगळं राहायचा निर्णय, मेहुणा अन् सासूची मारहाण
राज फक्त कर्मचारी होता, पण...
राज कुशवाह आणि सोनमच्या संबंधांबाबत गोविंदने नकारात्मक प्रतिक्रिया दिलीय. त्याने म्हटलं, राज आमच्या इथे कर्मचारी होता. सोनम त्याला राखी बांधायची. त्यांना सोनमच्या अफेअरबाबत काहीच माहित नव्हतं. सोनमने राजबाबत तिच्या आईलाही सांगितलं नव्हतं. सोनमच्या लग्नाबाबत गोविंद म्हणाला, लग्न लवकर यासाठी केलं गेलं, कारण पंडितने चांगला मुहूर्त काढला होता. सर्व काही धार्मिक नियमांनुसार झालं होतं. राजाचा भाऊ विपिन रघुवंशीने म्हटलं की, गोविंद मंगळवारीच इंदौरला पोहोचला होता. गोविंदा या हत्येबाबत माहित नसावं. आम्ही गोविंदसोबत स्पष्टपणे चर्चा केली, ते या हत्येच्या कटात सामील नव्हते. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.